मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीतील अलीकडच्या प्रसिद्ध जोड्यांमध्ये अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. दोघांमधल्या खास नात्याची अनेकदा चर्चा झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी साखरपुडा करून, त्यांच्या नात्याविषयी जाहीरपणे सांगितलं.
अग्गंबाई सासूबाई! आलियाबद्दल विचारलं असता, नितू कपूर म्हणाल्या…
अलीकडेच शिवानी आणि विराजसनं एका जाहिरातीसाठी लग्नाचा प्रसंग चित्रित केला होता आणि दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आलं. खऱ्या आयुष्यात ते लग्न कधी करणार, असा प्रश्न चाहते विचारत होते. त्यांची ही प्रतीक्षा संपणार असून, पुढच्या महिन्यात ते लग्न करणार असल्याचं कळतंय. ७ मे रोजी विराजस आणि शिवानी लग्नबंधनात अडकणार आहेत.


सध्या दोघांच्या घरी लग्नाची पूर्वतयारी वेगानं सुरू आहे. त्यातच त्यांनी नुकतीच छोट्या पडद्यावरील ‘किचन कल्लाकार‘ या कार्यक्रमाला हजेरी लागली होती. ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते.


कार्यक्रमाच्या आगामी भागात विराजस आणि शिवानी किचनमध्ये एकत्र कल्ला करताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. कार्यक्रमात पाककलेसह धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळतेच. यावेळी विराजसनं एक मजेदार उखाणा घेतला. विराजस उखाण्यात असं म्हणाला, ‘किचन कल्लाकारच्या मंचावर करायचंय आम्हाला श्रीखंड, शिवानी सोबत आहेच आता घेऊ का हे भांडं?’ हा उखाणा ऐकून सगळे हसून हसून लोटपोट झाले. शिवानीने हा उखाणा ऐकताना तिच्या पोटात गोळा आला असं म्हटलं.

दरम्यान, केळवणांसाठी या दोघांना त्यांचे मित्रमैत्रिणी आमंत्रित करत आहेत. अलिकडंच हे दोघांना अभिनेत्री सानिया चौधरी हिनं केळवणासाठी बोलावलं होतं. त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here