अहमदनगर : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात कित्येक जण आपल्याला आवडलेल्या अगर खटकलेल्या गोष्टीही फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सार्वजनिक करतात. नगरमध्ये मात्र, एका कार्यकर्त्याने शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यांना वाचा फोडण्यासाठी याचा वापर करण्याचे ठरविले आहे. ते करताना जीवाला धोका होऊ नये म्हणून त्याने चक्क पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संरक्षणाची मागणी केली आहे.

भांबरकर यांनी नगर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला आहे. हा सर्व प्रकार फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला दाखवायचा आहे. त्यासाठी बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली आहे. पाच दिवसात बंदोबस्त न मिळाल्यास एकटा जाऊन हे काम करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे.

मैत्रिणीला वाचवायला गेला, पण ‘तो’ही कालव्यात बुडाला
शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार व एमआयडीसी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. मटका, जुगार अड्डे, बिंगो सट्टा गेम, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट सट्टा, हॉटेलवर बेकायदा दारूविक्री, गुटखा विक्री असे इतर अनेक अवैध राजरोसपणे सुरू आहेत. पोलीस मात्र हितसंबंधामुळे यावर कारवाई करीत नाहीत, असा आरोप भांबरकर यांनी केला आहे.

अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरिकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. पोलीस कारवाई करणार नसतील तर फेसबुक लाईव्ह करून शहरातील अवैध धंदे दाखवून जनतेपुढे वास्तव ठेवायचे आहे. मात्र, हे करताना अवैध धंदे करणार्‍यांकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी भांबरकर यांनी केली आहे.

‘लग्नात तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही’, ११ वर्षांच्या सुखी संसारानंतर सासरच्यांचं धक्कादायक कृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here