लखनऊ: ‘मी उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री किंवा देशाची पंतप्रधान बनू शकते पण मला कधीही राष्ट्रपती व्हायचे नाही’, असे नमूद करत बसपा सुप्रीमो यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष यांचा आरोप फेटाळून लावला आहे.

वाचा :

उत्तर प्रदेशच्या राजकारणात सातत्याने केंद्रस्थानी राहिलेल्या बसपाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. बसपाचा अवघा एक उमेदवार निवडून आला. हे नेमकं कसं घडलं, हा प्रश्न उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात विचारला जात असून मायावती यांनी पडद्यामागे भाजपसोबत राजकीय फिक्सिंग केल्याचे आरोप विरोधी पक्षातून होत आहेत. त्यात आता अखिलेश यांनी मोठा दावा केला आहे. मायावती यांना राष्ट्रपती व्हायचे आहे आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या पक्षाची मते भाजपकडे वळवली, असे ते म्हणाले. त्यावर मायावती यांनी प्रत्युत्तर दिले असून अखिलेश यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.

वाचा :

राष्ट्रपती बनण्याचा मी कधीही विचार केलेला नाही, असे सांगत त्यांनी अखिलेश यांच्यावरच उलट आरोप केला. होण्यासाठी आणि भाजपने एकत्र येऊन या निवडणुकीत काम केल्याचा दावा मायावती यांनी केला. दलित आणि मुस्लिम समाजाने एकत्र येऊन एकाविचाराने मतदान केले तर मी उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री किंवा देशाची पंतप्रधानही बनू शकते मात्र, मला राष्ट्रपती व्हायचे नाही, असे मायावती यांनी पुढे नमूद केले. मी राष्ट्रपती झाल्यास अखिलेश यादव यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळेच त्यांनी जाणीवपूर्वक तसे विधान केले आहे, असेही मायावती म्हणाल्या. आज मुस्लिम समाजावर जो अत्याचार होत आहेत त्याला समाजवादी पक्ष जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला. अखिलेश यादव देश सोडून पळून जाणार असल्याचीही बरीच चर्चा असल्याचे सांगत मायावती यांनी टोलेबाजी केली.

वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here