मुंबई : बिग बॉसमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शहनाज गिल आता लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. बिग बॉसमध्ये असल्यापासून शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी सलमानच्या खूप जवळ होती. शहनाजचं बोलण, वागणं तिचा एकूणच अंदाज सलमानला आवडायचा. सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर शहनाज गिल बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिला सिद्धार्थची खूप आठवण आली आणि ती खूप भावुक झाली होती. त्यावेळी सलमाननं तिला सावरलं आणि तिला धीर दिला. त्यामुळे सलमानचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला.

लग्नसमारंभात पारंपरिक लूकमध्ये दिसले अनुष्का अन् विराट; Photo पाहून चाहते म्हणाले…

आता शहनाज आणि सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भाईजानच्या आगामी सिनेमामधून शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

शहनाज गिल

एका न्यूज पोर्टलनं दिलेल्या बातमीनुसार सलमान खान याच्या आगामी कभी ईद कभी दिवाली या सिनेमात शहनाजला संधी मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या या सिनेमात शहनाज आयुष शर्माबरोबर दिसणार आहे. अर्थात याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ती लवकरच होण्याची शक्यता आहे.

शहनाज गिल सलमान खान

आयुष शर्माची सिनेमात लागली वर्णी

अलिकडेच सलमानच्या कभी ईद कभी दिवाली या सिनेमात आयुष शर्माची वर्णी लागल्याची बातमी समोर आली आहे. या सिनेमात आधी श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी यांना घेतलं होतं. परंतु या दोघांचा पत्ता कट करत त्यांच्याऐवजी आयुष शर्मा आणि जहीर इक्बाल यांना संधी देण्यात आली आहे.

Photos :आयुष्य असावं तर प्रियांका चोप्रासारखं; घरात ढिगानं आहेत चपला, बूट आणि सँडल्स!

राघव जुयाल देखील दिसणार सिनेमात

दरम्यान, डान्सर, अभिनेता आणि सूत्रसंचालक असलेला राघव जुयाल हा देखील कभी ईद कभी दिवाली या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. अर्थात राघव आणि शहनाज गिल यांची या सिनेमात नेमकी कोणती भूमिका आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here