मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत आहे. सारा सोशल मीडियावर फार सक्रीय असते. इंस्टाग्रामवर साराला १.९ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

वाचा- अशी IPL मॅच कधीच पाहिली नाही; प्रशिक्षकाकडून खेळाडूला अपशब्द,कारण…

सारा तेंडुलकर नियमीतपणे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. आता साराला एका फ्रीलान्सर व्हिडिओग्राफर आणि एडिटरची गरज आहे. याबाबत साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. जर तुम्हाला सारासोबत काम करण्याची इच्छा आहे आणि तुम्ही पात्र असाल तर तिचा ईमेल आयडी contact@saratendulkar.in यावर अर्ज करू शकता. या कामाचे लोकेशन मुंबई आणि लंडन अशा दोन शहरात असेल.

वाचा- ECBकडून मोठी घोषणा; इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी ऑलराउंडर खेळाडूची नियुक्ती

सारा सध्या लंडन विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. याआधी तिने धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूलमधून शिक्षण घेतले होते. सारा आणि भारतीय संघातील युवा फलंदाज शुभमन गिल यांच्या अफेरच्या चर्चा देखील सोशल मीडियावर होत असतात. पण आजवर या दोघांनी या चर्चांना दुजोरा दिला नाही. शुभमनचे नाव शाहरुख खानच्या मुलीशी देखील जोडले गेलेय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार साराने अभिनय क्षेत्रात लवकरच पदार्पण करणार आहे. ती एका बॉलिवूड चित्रपटात दिसू शकेत असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. साराने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.

साराने शेअर केलेली पोस्ट

वाचा- मॅच जिंको किंवा नाही IPL मध्ये मुंबई एक नंबर; चाहत्यांसाठी हंगामातील पहिली आनंदाची

अर्जुनच्या पदार्पणाची प्रतिक्षा

साराचा भाऊ अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. पण अद्याप त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. मुंबईने आयपीएल २०२२मध्ये एकही मॅच जिंकली नाही. त्यामुळे मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. अशात गमावण्यासारखे काही नसल्याने मुंबईचा संघ अर्जुनला संधी देऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here