दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीनेही पुण्यात अलका टॉकीज चौकात ३० एप्रिल रोजी एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील बीकेसी अथवा गोरेगाव येथील एनएससी मैदानावर १४ व १५ मे रोजी शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचीही १ मे रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तसेच सरकारचाही समाचार घेणार आहेत.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती देताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, ‘१ मे रोजी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावर हजारो कार्यकर्ते जमणार आहेत. या निमित्ताने फडणवीस यांची ‘बूस्टर डोस’ सभाही होणार आहे.’