मुलीच्या हाताचा आधार घेऊन घराबाहेर पडलेल्या राऊत यांचे एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेले दृश्य पाहून विविध प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. पद्म पुरस्काराचे त्यांना प्रदान करण्यात आलेले फ्रेम केलेले प्रमाणपत्रही रस्त्यावर पडलेले त्यात दिसत आहे.
घर सोडण्याबाबतची कृती कायदेशीर असली, तरी ते ज्या पद्धतीने केले गेले, ती पद्धत चुकीची असल्याचे राऊत यांच्या मुलीने सांगितले. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून, पंतप्रधान मोदी यांच्या सत्तेखालील सरकारला कलाकारांचा मुळीच आदर नसल्याची टीका मधुमिता यांनी केली. सरकारने २०१४मध्ये घरे रिकामी करण्याबाबतीतला निर्णय घेतला असेलही; पण तो आम्हाला २०२०मध्ये मिळाला. राजीव गांधी यांनी सरकारी निवासाची सोय केल्यामुळे कदाचित हा राजकीय खेळ तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.