बदलापूर : बदलापूरच्या जुवेली गावाजवळील पोद्दार एव्हरग्रीन कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या प्रसाद जिंजूरके या तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. सोमवारी दुपारच्या सुमारास जुवेली गावाजवळील मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. या घटनेच्या तपासादरम्यान प्रसाद हा आदल्या दिवशी रात्री समसुल हक गुलाम करीम याच्यासोबत दारू प्यायला गेल्याचं काही जणांनी पोलिसांना सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी समसुल हक याचा शोध घेतला असता तो आदल्या दिवशीच कुटुंबासह आंध्रप्रदेशला रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सापळा रचत केली अटक…
त्यामुळे बदलापूर पूर्व पोलिसांच्या पथकाने आंध्रप्रदेशात जाऊन समसुल हक याचा शोध घेतला असता तो कुटुंबाला आंध्रप्रदेशात सोडून पुन्हा मुंबईला गेल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी घाईघाईने मुंबई गाठत समसुल हक हा कल्याणला पोहोचायच्या आधीच कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचला आणि त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, दारू प्यायल्यानंतर झालेल्या किरकोळ भांडणातून आपण प्रसादची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

याप्रकरणी समसुल हक याला अटक करण्यात आली असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here