मुंबई- Padma Laksmi on violence against Muslims in India: सुपर मॉडेल, टीव्ही होस्ट आणि लेखिका पद्मा लक्ष्मी ने दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात आणि मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये झालेल्या हिंसाचार आणि तोडफोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. पद्मा लक्ष्मीने भारतातील जातीय तणाव आणि मुस्लिमांवरील हिंसाचार यासंदर्भात अनेक ट्वीट केले, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लक्ष्मी म्हणाली की, भारतात अल्पसंख्याकांवर विशेषत: मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे, जे अत्यंत दुःखद आहे. हे पाहून मन दुखावतं. भारतात किंवा संपूर्ण जगात हिंदुत्वाला कोणताही धोका नाही, असेही पद्मा लक्ष्मी यावेळी म्हणाली.

पद्मा लक्ष्मीच्या या ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही लोक तिची बाजू घेत आहेत, तर काहींनी पद्मा लक्ष्मीवर टीका केली आहे. कुणी म्हटलं की लक्ष्मी जातीय तेढ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर कुणी म्हटलं की त्यांनी भारताच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये.

‘भारतात मुस्लिमांवरील हिंसाचाराचा उत्सव पाहून वाईट वाटले’

पद्मा लक्ष्मीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘भारतात मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार कसा साजरा केला जातो हे पाहून वाईट वाटतं. मुस्लिमविरोधी वक्तृत्वामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते आणि त्यांच्या मनात विष भरवले जाते. हा प्रचार धोकादायक आणि निंदनीय आहे कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला कमी लेखता तेव्हा त्यांच्या छळात सहभागी होणे खूप सोपे होते.’

पद्मा लक्ष्मी

पद्मा लक्ष्मी- संपूर्ण जगात हिंदुत्वाला कुठेही धोका नाही

आणखी एका ट्वीटमध्ये तिने लिहिले की, ‘प्रिय हिंदूंनो, मनात भीती बाळगू नका. भारतात किंवा इतर कुठेही हिंदू धर्माला धोका नाही. खऱ्या अध्यात्मात कोणत्याही प्रकारचा द्वेष पेरण्याची जागा नसते. या प्राचीन, विस्तीर्ण भूमीत सर्व धर्माच्या लोकांना शांततेनं राहता आलं पाहिजे.’

पद्मा लक्ष्मी

जहांगीरपुरी आणि खरगोनमध्ये काय घडलं?

हनुमान जयंतीच्या निमित्ताने एप्रिलच्या सुरुवातीला दोन समुदायांमध्ये हिंसाचार आणि संघर्ष झाला होता. या काळात जाळपोळ आणि दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या. अनेक वाहनं मोर्चाच्या हाती लागली. यामध्ये ८ पोलिसांसह एक स्थानिक रहिवासी जखमी झाला. जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशातील खरगोनमध्येही रामनवमीच्या मिरवणुकीत मोठा गोंधळ झाला होता.

कोण आहे पद्मा लक्ष्मी

पद्मा लक्ष्मी एक भारतीय मूळची अमेरिकन लेखिका आणि टीव्ही रिअॅलिटी होस्ट आहे. तिचं पूर्ण नाव पद्मा पार्वती लक्ष्मी आहे. तिचा जन्म चेन्नईतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. पद्मा लक्ष्मी दोन वर्षांची असताना पालकांचा घटस्फोट झाला. वयाच्या चौथ्या वर्षी पद्मा लक्ष्मी अमेरिकेत गेली आणि तिथेच तिचं पालन पोषण झालं. पद्मा लक्ष्मीने वयाच्या २१ व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. तिने अनेक आंतरराष्ट्रीय डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केले. सध्या टॉप शेफ या टीव्ही शोची ती जज आहे.

पद्मा लक्ष्मीचं खासगी आयुष्य

२००४ मध्ये पद्मा लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्याशी लग्न केलं. पण तीन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. ती Theodore J. Forstmann याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण २०११ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here