धुळे : बाहेरगावी असलेल्या लग्नाविषयी विचारणा करण्यासाठी मोबाईल वर कॉल केल्यानंतर तो कॉल कट न करताच सुरू राहिल्याने धुळ्यातील चौघांचा जातीय द्वेष समोर आला. त्यासंदर्भात मोबाईल मधील कॉल रेकॉर्डींग धुळे शहर पोलिसात सादर केल्याने चौघांविरूध्द ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला सर्व प्रकार…

प्रशांत दिलीप पटाईत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २२ एप्रिल रोजी बाहेरगावी लग्नाला जात असतांना धुळ्यातील विट व्यावसायिक असलेल्या मयूर मोरे (भोई) याचा कॉल प्रशांत पटाईत यांना आला त्यानंतर लग्न कुठे आहे?, केव्हा आहे? अशी विचारणा मयूर मोरे याने केली. तसेच आम्हीही लग्नाला येण्यासाठी तुमच्या मागे निघालो असल्याचे सांगितले. मोबाईलवर बोलणे झाल्यानंतर दोघांनीही कॉल कट न करताच तसेच खिशात ठेवले. त्यानंतर मयूर व सोबत असलेल्या बंटी मोरे, कैलास मोरे, मनोज मोरे या चौघांमध्ये लग्नाच्या विषयावर तसेच जातीवाचक आक्षेपार्ह बोलणे सुरू झाले. कॉल कट न झाल्याने त्यांचे हे सर्व संभाषण रेकॉर्ड होत होते. सुमारे १५ मिनीटे ४५ सेकंद हा कॉल सुरू होता. या कॉलची रेकॉडींग प्रशांत पटाईत यांनी रात्री घरी आल्यानंतर झोपण्याच्यावेळी शांतपणे ऐकली. तेव्हा मयूर मोरे याच्यासोबत असलेल्या चौघांचा जातीय द्वेष समोर आला.

राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर; अमित ठाकरेही औरंगाबादला रवाना होणार
रेकॉर्डींगमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान…

या रेकॉर्डींगमध्ये मयूर मोरे याने जातीवाचक तसेच महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले असून त्यासोबत असलेले तिघेजण समर्थन देतांना स्पष्ट होत आहे. यामुळे प्रशांत पटाईत यांनी ही रेकॉर्डींग थेट धुळे शहर पोलिसात सादर करीत फिर्याद दाखल केली आहे. यानुसार मयूर मोरे, बंटी मोरे (दोन्ही रा. भोईवाडा मोगलाई, धुळे व कैलास मोरे (भोई) आणि मनोज मोरे (भोई) रा. साक्री रोड धुळे या चारही जणांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं… मराठवाड्यात ३ महिन्यांत २३३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन
घटनेनंतर समाज बांधवांमध्ये संतापाची लाट…

या घटनेनंतर समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली असून जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मयूर मोरे व त्याच्या साथीदारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच या ऑडिओ क्लिपमध्ये महिलांविषयी देखील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महिलांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला असून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महिलांकडून धुळे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. सोशल मीडियावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात असून या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत.

अवघ्या १० मिनिटात चार्ज होणारा OnePlus चा भन्नाट स्मार्टफोन भारतात लाँच, मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा किंमत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here