मुंबई : सुपर माॅडेल मलायका अरोराचा कारचा अपघात होऊन जवळजवळ महिना लोटला. २ एप्रिल २०२२ रोजी खोपोलीजवळ एक्सप्रेस वेवर मलायका अरोराच्या कारला मोठा अपघात झाला होता. त्याच वेळी तिला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं. उपचारानंतर ती त्यातून बरीही झाली आणि तिनं तिचं कामही सुरू केलं. तिनं आपले अनुभव सोशल मीडियावर शेअरही केले होते. आता तिनं डोळ्याजवळ झालेल्या जखमेचे फोटो इन्स्टा पोस्टवर शेअर केले आहेत.

मलायका अरोरानं इन्स्टा स्टोरीवर आपला फोटो शेअर केला आहे. त्यात ती ज्युस पिताना दिसतेय. तिनं काळा गाॅगल घातला आहे. पण तरीही कपाळावरची जखम दिसून येत आहे. आयब्रोच्या मध्ये जखमेची खूण आहे. फॅन्सना हे लक्षात आलं आणि ते चिंतेत पडले. सगळ्यांनी काळजी व्यक्त केली.

मलायका अरोरा

Irrfan Khan: इरफानचे १० डायलॉग जे आजही आहेत लक्षात

मलायकानं शेअर केला अपघाताचा अनुभव

मलायकानं दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं की, माझ्या आयुष्यातील तो सर्वात भयानक दिवस होता. हा दिवस मी कधीही विसरू शकत नाही. अपघातामुळे मला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला आहे. त्या धक्क्यातून हळूहळू मी बाहेर येत आहे. आपण सिनेमामध्ये अपघात बघतो, अपघात झाल्यानंतर येणारं रक्त दाखवलं जातं. हे सगळं प्रत्यक्षात माझ्याबरोबर घडत होतं. मी हे काहीच विसरू शकलेली नाही.’

Video : प्रियांका चोप्रानं ब्लॅक बिकनीवर केला डान्स, भल्याभल्यांची बोलती बंद!

मलायका अरोरानं मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘मला बराच वेळ हेच कळत नव्हतं की मी जिवंत आहे की नाही. इतका मोठा शॉक मला बसला होता. अपघातानंतर माझं डोकं प्रचंड ठणकत होतं. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं होतं की मी जिवंत आहे. माझ्या डोक्याला मार बसल्यानं त्यातून रक्त वहात होतं. ते मला दिसलं. मला नेमकं कळलंच नाही की मला काय होतं आहे. एक मोठ्ठा आवाज आला. जोरदार धक्का बसला आणि सर्व काही अस्पष्ट दिसू लागलं.रुग्णालयात गेल्यानंतर मला शुद्ध आली.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here