मुंबई- अभिनेत्री करिश्मा कपूरने अलीकडेच चाहत्यांसह सोशल मीडियावर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतलं होतं. जिथे तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. या प्रश्नांची उत्तर देताना करिश्माने तिच्या लग्नाबाबत अतिशय मजेशीर उत्तरही दिलं. यावेळी एका चाहत्याने विचारलं तुला पुन्हा लग्न करायचं आहे का? या प्रश्नाला टाळण्याऐवजी लग्नावर करिश्माने उत्तर देणं योग्य मानलं. करिश्माने हे उत्तर इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे.

Irrfan Khan: इरफानचे १० डायलॉग जे आजही आहेत लक्षात

लग्नाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी करिश्माने गोंधळलेल्या मुलीचा चेहरा शेअर केला. तीन फोटो शेअर करून, करिश्माने लग्न शेवटी वेळ आणि परिस्थितीवर अवलंबून असेल असं म्हटलं. सध्या करिश्मा कपूर तिच्या आगामी क्राईम ड्रामा ‘ब्राऊन’ मध्ये व्यग्र आहे.


आलिया भट्टच्या लग्नात हा विधी

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नसोहळ्यात मेहुणी करिश्मा कपूरवर तुटून पडली. पंजाबी रीतिरिवाजांमध्ये असे मानले जाते की ज्याच्यावर नवविवाहित वधूच्या कळ्या पडतात, तिचे लग्न लवकर होण्याची शक्यता असते. या सोहळ्याचा फोटो स्वतः करिश्मा कपूरने शेअर केला आहे.

करिश्मा कपूर


करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमिचा नवरा आणि लग्न

करिश्मा कपूरचं पहिलं लग्न २००३ मध्ये संजय कपूरशी झालं होतं. दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. पण २०१४ मध्ये संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. करिश्माचं ते पहिलं लग्न होतं तर संजयचं दुसरं. घटस्फोटानंतर करिश्मा मुलांना घेऊन आई- बाबांसोबत राहू लागली. तर संजयने काही वर्षांनी तिसरं लग्न केलं.

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था…’, डॅडीचा जावई अक्षय वाघमारे संतापला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here