बॉलिवूडच्या अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळं चर्चेत असते. कतरिनानं जेव्हा सिनेसृष्टीत एंट्री केली तेव्हा तिचं नाव अभिनेता सलमान खान याच्यासोबत जोडलं गेलं. दोघंही चार वर्षे नात्यात होते. त्यामुळं दोघांच्या रिलेशनशिपची प्रचंड चर्चा झाली. दोघंही लग्न करणार होते, असंही म्हटलं गेलं. परंतु काही कारणांमुळं दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
सलमान आणि कतरिना यांच्या ब्रेकअपचं कारण अभिनेता रणबीर कपूर असल्याचं म्हटलं गेलं. झालं असं होतं की, राजनीती आणि अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान कतरिना आणि रणबीर यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर दोघं लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिले.याच दरम्यान कतरिना आणि रणबीर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी परदेशात इबिजा इथं गेले होते. इथल्या बीचवरच्या दोघांच्या फोटोंनी प्रचंड धुमाकूळ घातला होता.जितं तिथं रणबीर आणि करितानाच्या या बीच फोटोंची चर्चा सुरू होती.
व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये कतरिनानं लाल आणि पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली होती, तर रणबीर शॉर्टसमध्ये दिसतोय. दोघंही एकमेकांसोबत निवांत वेळ घालवत असतानाचे हे फोटो, कुणीतरी चोरून काढले होते. यामुळं सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीबद्दलही बोललं गेलं.
रणबीरसोबतच्या व्हायरल फोटोंवर विचारलं असता कतरिनानं सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘पुढच्यावेळी अशा ठिकाणी फोटो काढणार असाल, तर आधी कल्पना देत चला, मी मॅचिंग बिकिनी घातली असती’, असं तिनं म्हटलं होतं.
कतरिना आणि रणबीरच्या या फोटोंवर एक्स बॉयफ्रेंड सलमान खानला प्रश्न विचारल्यानंतर तो प्रचंड भडकला होता. ‘ जर तुमच्या गर्लफ्रेंड, बायको किंवा बहिणीचे फोटो असे लीक झाले असते तर तुम्हाला कसं वाटलं असंत? कोणाचेही असे खासगी फोटो व्हायरल किंवा लीक करणं चुकीचं आहे’, असं त्यानं म्हटलं होतं.