Rupali Thombre Patil | पुनम गुंजाळ यांना ‘एक करोड ताईवर नाराज’ या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी ग्रुपचे अॅडमीन धैर्यशील पाटील यांनी रिक्वेस्ट पाठवली होती. पुनम गुंजाळ यांनी ही रिक्वेस्ट स्वीकारत त्या ग्रुपवर जॉईन झाल्या होत्या.

 

Rupali Thombre Patil
Rupali Thombre Patil | पुनम गुंजाळ यांना ‘एक करोड ताईवर नाराज’ या पेजवर जॉईन होण्यासाठी ग्रुपचे अॅडमीन धैर्यशील पाटील यांनी रिक्वेस्ट पाठवली होती.

हायलाइट्स:

  • फिर्यादी यांनी कोणत्याही महिलेविषयी असे बोलू नये असा मेसेज केला
  • आरोपींनी रुपाली पाटील यांना अश्लील शिवीगाळ केली
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी पुण्यातील एका फेसबुक ग्रुपवर कारवाई करण्यात आली आहे. या फेसबुक ग्रुपच्या अ‍ॅडमिन्सवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फेसबुकरील ‘एक करोड ताईवर नाराज’ या सोशल मीडिया ग्रुपच्या मनसेच्या माजी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांचे बदनामीकारक फोटो पोस्ट करण्यात आले होते. तसेच रुपाली पाटील-ठोंबेर यांना अश्लील शिवीगाळ करणारा मजकूरही या ग्रुपवर होता.
माफी मागितली की सगळं संपलं का?; रुपाली पाटील-ठोंबरे बंडातात्यांवर बरसल्या!
या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यावर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुनम गुंजाळ यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून सागर चव्हाण, गजानन पाटील, ध्रुवराज ढकेडकर , राजेश दंडनाईक, सचीन कोमकर, सावळया कुंभार, निजामुदिदन शेख, सुधीर लाड व इतर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वहिनीसाहेब स्वत-ला आवरा ; रुपाली ठोंबरेंचा अमृता फडणवीसांना सल्ला

पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पुनम गुंजाळ यांना ‘एक करोड ताईवर नाराज’ या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी ग्रुपचे अॅडमीन धैर्यशील पाटील यांनी रिक्वेस्ट पाठवली होती. पुनम गुंजाळ यांनी ही रिक्वेस्ट स्वीकारत त्या ग्रुपवर जॉईन झाल्या होत्या. मात्र, या फेसुबक ग्रुपवर रुपाली पाटील ठोंबरे यांची कुठलीही परवानगी न घेता त्यांचे फोटो अपलोड केल्याचे दिसले. त्यानंतर फिर्यादी यांनी कोणत्याही महिलेविषयी असे बोलू नये असा मेसेज केला. यावर आरोपींनी रुपाली पाटील यांना अश्लील शिवीगाळ केली. आरोपी सुधीर लाड याने स्वतःच्या पर्सनल अकाऊंटवरून फेसबुक लाइव्ह करून रुपाली पाटील-ठोंबेर यांना शिवीगाळ केली आणि त्यांची खिल्ली उडवली. त्यानंतर पुनम गुंजाळ यांनी फरासखाना पोलिसात बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला होता. सध्या फरासखाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : police booked admins of facebook page ek karod taivar naraj due to criticism against ncp rupali thombre patil
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here