औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होते आहे. तर राज ठाकरेंच्या याच सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे ज्या मैदानावर सभा घेणार आहेत, त्याच मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. इतकंच नाहीतर याला शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दुजोरा दिला असून, एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.
राज ठाकरेंच्या सभेला भाजपचा छुपा पाठिंबा…
तर औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेमागे भाजपचा हात आहे. त्यांच्याकडूनच सर्व धडे मिळत असून, भाजपच्या काही नेत्यांनी सभेला लोकं पाठवण्याबाबत सुद्धा बोलून दाखवलं असल्याचं सुद्धा खैरे म्हणाले. महाविकास आघाडीत बिघाडी आणण्यासाठी हे सर्व काही सुरू असल्याचं सुद्धा खैरे म्हणाले.