सातारा: रस्त्याच्या निकृष्ट कामावरुन शिवसेना आमदार महेश शिंदेंनी अधिकारी आणि ठेकेदाराला भर रस्त्यात झापलं. साताऱ्यात ही घटना घडली. इतकंच नाही तर इंजिनिअर आणि ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणीही त्यांनी केली (Low Quality Road In Satara).

हेही वाचा – वरातीत नाचण्यावरुन वाद, वऱ्हाडी मंडळींसह नवरदेवाचे लग्न मंडपातून पलायन

नेमकं प्रकरण काय?

साताऱ्यात औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या देगाव रोडच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शिवसेना आमदार महेश शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. १ किलोमीटरच्या रस्त्यासाठी जवळपास ६ कोटी रुपये या कामाला दिले. तरीही या रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी आमदारांकडे नागरीकांनी केल्या होत्या.

Satara shivsena mla mahesh shinde

Satara shivsena mla mahesh shinde

या तक्रारींची दखल घेत महेश शिंदे यांनी थेट या रस्त्याला भेट देऊन प्रत्यक्ष पाहाणी केली. रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम पाहाताच आमदार शिंदे संतापले आणि त्यांनी बांधकाम अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलच धारेवर धरलं. १२०० मीटरच्या रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देखील हे काम निकृष्ट होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा – मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही, मंदिरातील घंटानाद थांबवणार नाही, जालन्यातील ‘त्या’ गावाचा मोठा निर्णय

अधिकारी-ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणी

रस्त्याचे काम करणाऱ्या इंजिनिअरचे आणि ठेकेदारांचे साटेलोटे असल्याचा आरोपही शिंदेंनी केला आहे. तर, संबंधित इंजिनिअर आणि ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणीही त्यांनी केलीये. यावेळी स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. गेल्या ३० वर्षांपासून हा रास्त खराब असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी नागरीकांनी आमदारांकडे केलीये.निकृष्ट दर्जाचा रस्त बनवला, साताऱ्यात शिवसेना आमदाराने अधिकारी-ठेकेदाराला झापलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here