मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनीही या सभेवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘इतरांना सभेला माणसं भाड्याने आणावी लागतात. पण साहेबांच्या सभेला लोक स्वतःहून येतात कारण राज ठाकरे म्हटलं की गर्दी ही होणारच’ असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, ‘राज ठाकरे स्वतः कायद्याचं पालन करतात आणि पदाधिकाऱ्यांना देखील करायला सांगतात. राज ठाकरे कुठल्याही जाती धर्मावर बोलत नाहीत. त्यांची सभा लोकांच्या कल्याणासाठी आहे. राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेला गर्दी होते. ‘ असंही यावेळी त्या म्हणाल्या.

तेच मैदान, तीच गर्दी! राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेही घेणार औरंगाबादमध्ये सभा“राज ठाकरे नेहमी कायद्याचं पालन करतात. मनसेनं कधीच कायद्याचं उल्लंघन केलं नाही. राज ठाकरे कोणत्याही धर्मावर बोलत नाही” असं शालिनी ठाकरेंनी म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही शालिनी ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांना एकत्र बघायला आवडेल” असंही शालिनी ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर मनसे-भाजप युतीबाबत विचारलं असता यावर राजसाहेब उत्तर देतील असंही शालिनी ठाकरे म्हणाल्या. सध्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून उद्या ३० एप्रिलला राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

राज ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांना एकत्र बघायला आवडेल – शालिनी ठाकरे

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर गुरुवारी रात्री उशिरा परवानगी मिळाली आहे. यानंतर राज ठाकरे यांची १ मे रोजी सभा होणार, हे अधिकृरित्या स्पष्ट झाले आहे. आता या सभेसाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची तयारी करण्यात येत आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलिसांसह इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. सोबतच एसआरपीएफच्या तुकड्या सुद्धा मागवण्यात आल्या आहेत.

राज ठाकरेंच्या सभेच्या बंदोबस्तासाठी ३ डीसीपी ६ एसीपी, ३० पीआय, इतर ३०० अधिकारी आणि २ हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात असतील. सोबतच औरंगाबाद ग्रामीण, जालना, अहमदनगर, पुणे यासह गरज पडल्यास इतर जिल्ह्यांमधूनही पोलिसांची कुमक मागवली जाण्याची शक्यता आहे. तसेच काही एसआरपीएफच्या तुकड्या सुद्धा तैनात करण्यात येणार आहे. तसेच सीआयडीचं एक विशेष पथक सभेआधीपासून सभा संपल्यानंतरपर्यंत विशेष लक्ष ठेवून असणार आहे.

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना झटका; कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला, आता…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here