मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeay) यांनी २ एप्रिलच्या सभेत मशिदीवरील भोंगे हटवण्यासंदर्भीतील घेतलेली भूमिका, हनुमान चालिसा पठण आणि ५ जूनचा अयोध्या दौरा यामुळं राज्याच्या राजकारणात ते चर्चेत आहेत. राज ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेमूळं भाजप (BJP) आणि मनसे (MNS) यांच्यात युती होईल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप आणि मनसेच्या युतीला राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं हिरवा कंदील दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. भाजप मनसे युतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘नथुराम गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी’, मेवाणींच्या अटकेवर भडकले प्रकाश राज
भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. युतीच्या बातम्या सोडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या युतीच्या बातम्या काही लोकांनी सोडलेल्या आहेत. आमची औपचारिक बैठक देखील झालेली नाही, कोणता प्रस्ताव देखील त्याबाबत नाही. अलीकडील काही काळात राज ठाकरे यांनी ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्या आम्ही देखील मांडत आहोत. मात्र, आमची अजून चर्चा झालेनी नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आम्ही कुठं बोललो आहोत आम्हाला युती करायची आहे. भाजपचा अजेंडा वेगळा आहे आमचा अजेंडा वेगळा आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

भारतीय जनता पार्टी कोणत्याही पक्षाला सोबत घेताना राज्य पातळीवरील कार्यकारिणी निर्णय घेते. मात्र, राज ठाकरेंच्या अमराठी भूमिकेमुळं त्यांच्यासोबत युतीचा निर्णय घेताना तो केंद्रात घ्यावं लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आज तरी मनसेबाबत युतीचा कोणताही प्रस्ताव नाही, असं पाटील यांनी म्हटलं.

एखाद्या नेत्यानं चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. आमच्या नेत्याचं कौतुक केलं तर त्यांच्या पोटात का दुखतंय. आमच्या राजकारण्यांच्या मनावर काही नसतं. राज्यातील आणि देशातील जनतेच्या जनमताचा कानोसा घेऊन निर्णय घेतला जाईल, रावसाहेब दानवे म्हणाले.
मुंबई इंडियन्ससाठी गूड न्यूज, भारताचा मॅचविनर गोलंदाज नवव्या सामन्यासाठी मैदानात उतरणार
भाजप आणि मनसे युती झाली की नाही काय कळायला मार्ग नाही. सत्ता येण्यासाठी देश पातळीवर आघाड्या झाल्या आहेत. आपण यूपीए आणि एनडीच्या आघाड्या झाल्या होत्या, असं अजित पवार म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांचं अलीकडचं भाषण पाहिलं तर ते भाजपचा अजेंडा राबवत असल्याचं दिसतंय. समाजात भेद निर्माण करण्याची जबाबदारी भाजपनं राज ठाकरे यांच्यावर टाकली की काय असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. भाजप मनसे युती झाल्यास राज ठाकरेंचं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल, असं देखील ते म्हणाले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here