मॉस्को : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध २४ फेब्रुवारीपासून सुरु झालं होतं. युद्धाला दोन महिने पूर्ण झाले असून सैन्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी रशियातील मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर महिला युद्धाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. त्या महिलांनी परिचारिकांचा वेष परिधान केला असून त्यावर झेड हे इंग्रजी अक्षर लिहिलं आहे. त्या महिलांच्या गटाला ‘सिस्टर्स फॉर विक्टरी’ असं म्हटलं जात आहे. त्या महिला रशियाच्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी युद्ध सुरु असलेल्या लुहान्स्क या भागात पोहोचल्या होत्या. त्या महिला रशियन सैन्याच्या पत्नी किंवा मैत्रिणी असल्याचा दावा रशियन सोशल मीडियावर केला जात आहे. रशियन सैन्याला इस्टर डे निमित्त केक भरवण्यासाठी त्या तिथं पोहोचल्या असल्याची माहिती आहे.

Video : फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर टोमॅटो फेकले, विजयानंतरच्या पहिल्या कार्यक्रमात काय घडलं?
डेलीमेलच्या बातमीनुसार पूर्व यूक्रेनच्या लुहान्स्क भागात त्या महिला रशियन सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी पोहोचल्या होत्या. रशियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीके आणि इन्स्टाग्रामवर महिलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. त्या महिलांनी यापूर्वी युद्धात तुमची आवश्यकता आहे, असं आवाहन त्या महिला रशियन तरुणांना करत होत्या.

यूक्रेनमध्ये हस्तक्षेप केल्यास परिणामांना तयार रहा, पुतीन यांची पाश्चिमात्य देशांना धमकी
रशियातील सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर एलोनानं यापूर्वी रशियन सैन्याला उद्देशून एक मेसेज दिला होता. प्रत्येक आव्हानापुढं मजबुतीनं उभं राहिलं पाहिजे, आताच हार मानू नये, असं आव्हान एलोना हिनं केलं होतं. कठिण प्रसंग निघून जातील, सर्व ठीक होईल, असं देखील ती म्हणाली होती. लुहान्स्क फॅशन वीकमध्ये सहभाग नोंदवलेली कीवायलेटा मोस्केलेंको देखील त्यामध्ये दिसून आली होती. यामध्ये रशियन अभिनेत्री अनास्तासिया चेपुरोवा देखील सहभागी झाली होती.

रशिया यूक्रेनमध्ये युद्ध कैद्यांची अदलाबदली
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु असलं तरी दुसरीकडे दोन्ही देशांनी कैद्यांची अदलाबदली सुरु केली आहे. रशियानं यूक्रेनच्या ४५ जणांना सोडलं आहे. यूक्रेनच्या उपपंतप्रधान इरीना विरेशचूक यांनी फेसबुक पोस्टमध्ये माहिती दिली आहे. ४५ जणांमध्ये १३ अधिकारी, २० सैनिक आणि १२ नागरिकांच समावेश आहे. २४ मार्चला यूक्रेननं पकडलेल्या १० रशियन अधिकाऱ्यांना १० नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात सोडलं होतं. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धात पकडलेल्या युद्धकैद्यांना सोडण्यास ११ मार्चपासून सुरुवात केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here