कोल्हापूर : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगरावरील गुलाल वाहून गेला. सोसाट्याचा वारा आणि पावसाने भाविक ग्रामस्थ आणि दुकानदारांची मोठी धावपळ उडाली. धुळीचे वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला. वादळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

खरंतर, पंधरा दिवसांपूर्वी ज्योतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमेला यात्रा भरली होती. पाच ते सहा लाख भाविकांनी उपस्थिती लावली होती. यात्रेनंतर प्रत्येक रविवारी पाकाळणी झाली. त्यामुळे डोंगरावर सर्वत्र गुलाल दिसून येत होता. मंदिराची शिखरे आणि आवार मंदिराचा प्रशस्त मार्ग गुलालाने माखला गेला होता. पण वादळी पावसाने ज्योतिबा डोंगरावरील गुलाल धुऊन गेला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वादळी वाऱ्याचा कहर; गुलालाने माखलेला ज्योतिबाचा डोंगर धुवून गेला

वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. डोंगरावर सर्व ठिकाणी पावसाचे पाणी गुलालाने गुलाबी झाले होते. पाण्याचे लोट मंदिर परिसरात दिसत होते. गेली दोन दिवस कडक उन्हामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पारा ४० च्या पुढे चालला होता. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास आभाळ काळ्या ढगांनी व्यापून गेले आणि मग सुरू झाले धुळीचे वादळ. संपूर्ण कोल्हापूर शहरावर धुळीच्या वादळाची चादर पसरली होती. पत्रे, प्लास्टिक कागद, पिशव्या वादळाने भिरकावून दिल्या.

Weather Alert : कोल्हापुरात अवकाळी पावसाचा कहर; धुळीचे वादळ, गारांच्या पावसाने हाहाकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here