बीड : सर्कशीत खेळ दाखवणाऱ्या विदुषकाला पाहायला जशी गर्दी असते, तशी राज ठाकरेंच्या सभेला बाहेरून गर्दी होते असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेवरून (Raj Thackeray Aurangabad Sabha), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे नेते, सचिन खरात (Beed RPI leader Sachin Kharat) यांनी राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सचिन खरात म्हणाले की, ‘राज ठाकरे यांचा पक्ष आता संपलेला आहे. त्यामुळे आता ते हनुमान चालीसा आडून हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे मला एक मला सांगायचं आहे, की एक सर्कस चाललेली असते. त्यावेळेस सर्कस बघण्यासाठी फार गर्दी असते. त्याचं कारण सर्कसमध्ये विदूषक हा खेळ करत असतो आणि तो खेळ पाहण्यासाठी गर्दी होते. मात्र, सर्कस संपल्यानंतर त्या तंबूमध्ये कोणीच राहत नाही.’

शरद पवारांनी अचानक घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तब्बल दीड तास कशावर झाली चर्चा?
‘उद्या सुद्धा औरंगाबादमध्ये बाहेरून येणारी गर्दी मोठी असणार आहे. मात्र, औरंगाबादची जनता नसणार आहे. कारण, औरंगाबाद ही क्रांतिकारी भूमी आहे. पंरतु बाहेरून लोक गर्दी करतील अन् लगेच तो तंबू रिकामा होईल. जशी त्यांच्या सभेला गर्दी होते तशी त्यांना मतं पडत नाहीत’ असं म्हणत सचिन खरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर घणाघात केला आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘राज ठाकरे हे बहुजन नेत्यांचा विरोध करतात आणि फक्त विशिष्ट नेत्यांचे नाव घेतात. आजपर्यंत त्यांनी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांचे दर्शन घेतलं नाही. मला एक त्यांना सांगायचं, तुम्ही जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा अपमान करत आहात. उद्याच्या सभेला बाबासाहेबांची तुलना इतरांसोबत करू नका’, अशी विनंती देखील यावेळी खरात यांनी केली.

पाहा VIDEO : धो-धो पावसाने दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगरावरील गुलाल गेला वाहून

दरम्यान, शरद पवार आणि राष्ट्रवादीला जातीयवादी म्हणण्यापेक्षा, तुम्ही अगोदर चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे दर्शन घेतले का ? वडूला जाऊन संभाजी महाराजांचे दर्शन घेतले का ? अहिल्यादेवींचे दर्शन घेतलं का ? असा सवाल करत सचिन खरात यांनी तुम्ही जातीयवादी आहेत की नाही ? हे अगोदर तपासा असा सल्ला देखील दिला.

तेच मैदान, तीच गर्दी! राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेही घेणार औरंगाबादमध्ये सभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here