मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांच्या बैठकीत विरोधकांना आक्रमकपणे उत्तर देण्याच्या सूचना केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राज ठाकरे यांचं हिंदुत्त्व खोटं आहे हे दाखवून देण्याचं आवाहन बैठकीत केलं आहे.

 

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • शिवसेनेची काम लोकांपर्यंत पोहोचवा,
  • बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते
  • भाजप आणि राज ठाकरेंचं हिंदुत्त्व खोटं हे दाखवून द्या
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेची (Shivsena) महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेनेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सेनेचे नेते, प्रवक्ते आणि खासदार उपस्थित आहेत. आजच्या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात न दिसलेल्या खासदार भावना गवळी देखील या बैठकीला उपस्थित आहेत. भाजप आणि विरोधकांवर तुटून पडा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या आहेत. शिवसेनेची काम जनतेपर्यंत पोहोचवा, असं देखील ते म्हणाले.
मातोश्रीवर तातडीची बैठक, उद्धव ठाकरे शिवसेना खासदारांना कोणता कानमंत्र देणार?
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे. भाजप आणि राज ठाकरेंचं हिंदुत्त्व खोटं आहे हे जनतेला दाखवून द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत शिवसेनेची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठं होते असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदार, प्रवक्ते आणि नेत्यांना या सूचना दिल्या आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या काही दिवसांमध्ये बीकेसीला शिवसेनेची सभा घेणार असून विरोधकांना प्रत्युत्तर देणार आहेत.
Bhavana Gawali: शिवसेना खासदार भावना गवळी यांना ‘ईडी’कडून समन्स
शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्या काही दिवसांपासून प्रसिद्धीमाध्यमांपासून आणि सार्वाजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. भावना गवळी यांना ईडीनं आणखी एक समन्स बजावलं आहे. भावना गवळी यांना ईडीनं यापूर्वी तीन समन्स बजावले होते. मात्र, त्या ईडी चौकशीला उपस्थित राहिल्या नव्हत्या. मात्र, आजच्या शिवसेना खासदारांच्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्या आहेत. भावना गवळी या ईडी चौकशीला सामोरं जाणार का हे आता पाहावं लागणार आहे. शिवसेना खासदारांच्या शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास बैठक झाली होती. या बैठकीनंतर शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra cm shivsena party leader uddhav thackeray said party leader should be aggressive against bjp and other opposition parties
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here