हवामान अंदाज महाराष्ट्र: Weather Alert : राज्यात उष्णतेचा कहर, ‘या’ तारखेपर्यंत उन्हाचा तडाखा सोसायला तयार राहा! – pune heat wave continues in the city weather alert maharashtra weather today
पुणे : पुणे शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट यापुढेही कायम राहणार असून पाच मेपर्यंत शहरात उच्चांकी तापमान नोंदविले जाईल, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारी शहरात ४०.७ कमाल तापमान नोंदवण्यात आले असून, किमान तापमानातही २५.४ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात नोंदवलेल्या तापमानाचा विचार केला, तर सरासरीपेक्षा यंदा कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाल्याचे पुणे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहराप्रमाणेच जिल्ह्यातही तापमानात मोठी वाढ झाली असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. शिरूरमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक ४४.४ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. दोन दिवसांपासून ४५ अंशांवर जाऊन पोहोचलेला ढमढेरे गावाचा पारा काही अंशी खाली आला असून, शुक्रवारी ढमढेरे गावात ४३.८ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. दौंड, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क या परिसरातही तापमानाचा पारा ४२ अंशांपेक्षा जास्त आहे. VIDEO : धो-धो पावसाने दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगरावरील गुलाल गेला वाहून शहराप्रमाणेच जिल्ह्यातही पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून, ४ आणि ५ मेला पुणे शहराच्या कमाल तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे जाईल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. या अंदाजाप्रमाणे पुढचे काही दिवस शहराच्या उष्णतेत चांगलीच वाढ करणार असून, यामुळे पुणेकरांना उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तापमान आकडेवारी (तापमान : अंश सेल्सियसमध्ये)