Sushilkumar Shinde Majha Katta : सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पुन्हा उभी केली पाहिजे : सुशीलकुमार शिंदे

Sushilkumar Shinde Majha Katta : मी कधीही जी-23 किंवा आणखी कोणत्याही ग्रुपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नसल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. गांधी कुटुंबाविषयी लोकांच्या मनात वेड आहे. गरिब माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे. पुन्हा सगळ्यांनी एकत्र येऊन काँग्रेस उभी केली पाहिजे, ती होईल असा विश्वास असल्याचे शिंदे म्हणाले.

काँग्रेसचा बेस हा गरिब माणूस आहे. तर दुसरा सर्वधर्म समभाव हा आहे. या सर्वांना सोबत घेऊन काम केले पाहिजे असे शिंदे म्हणाले. काँग्रसचे अनेक पराभव झाले, त्यानंतर पुन्हा काँग्रसचे राज्य आले असे शिंदे म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या पत्नी उज्वला शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.

आता त्यांनी राजकारणात पुढाकार घेऊ नये : उज्वला शिंदे 

सुशिलकुमार शिंदे यांचा स्वभाव मवाळ आहे, त्यांनी कधी आक्रमक भूमिका घेतली नाही. ते पदासाठी कधीही आग्रही नसतात असे उज्वला शिंदे म्हणाले. आता त्यांनी थोडेसे निवांत बसावे. त्यांनी राजकारणात जास्त पुढाकार घेऊ नये असे मला वाटते असे उज्वला शिंदे म्हमाल्या. घरामध्ये लक्ष देण्याचे त्यांना आणखी जमत नसल्याचे उज्वला शिंदे म्हणाल्या. आता ते कुटुंबाच्या जवळ आले आहेत. ज्यावेळी त्यांना दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी आली पण ते झाले नाहीत. त्यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना बोलावे असे मला वाटत होते असे उज्वला शिंदे म्हणाल्या. मात्र, सोनिया गांधी यांनी त्यांना मुख्यमंत्री करण्याचे ठरवले होते असे त्या म्हणाल्या. मंत्रीपदासाठी प्रणिती शिंदे या आग्रही नाहीत, आज ना उद्या तिला मंत्रीपद मिळेल असेही उज्वला शिंदे म्हणाल्या.

मैत्रीत माणूस कसा फसतो याचा अनुभव आला

शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यावेळी काही लोकांनी शरद पवार यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक पत्र दिल्लीला दिले होते. त्यावेळी ते पत्र घेऊन विलासराव देशमुख माझ्याकडे आले होते. त्यावेळी विलासराव मला म्हणाले की, या पत्रावर सही करा. मी न वाचताच मी त्यावर सही केली. त्यानंतर मला कळाले की त्या पत्रामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदावरुन काढावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होतो. मैत्रीत माणूस कसा फसतो याचा त्यावेळी मला अनुभव आला. पण त्यावेळी माझी चूक झाल्याचे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here