मुंबई : गेल्या दोन वर्षांमध्ये करोनाच्या साथीमुळे अनेक नागरिकांनी मनोरंजनासाठी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. घराबाहेर पडण्याऐवजी प्रेक्षकांनी वीकेंडला घरीच आराम करत ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे, वेब सीरिज पाहून स्वतःचं मनोरंजन करून घेतलं. त्यामुळे मनोरंजन विश्वामध्ये थिएटरप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्मलाही महत्त्व आलं आहे. त्यामुळे आजही ओटीटीवर अनेक सिनेमे, वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. आता मे महिन्यामध्ये प्रेक्षकांनाही मनोरंजनाची पर्वणी घरबसल्या अनुभवता येणार आहे. मे महिन्यामध्ये कोणते सिनेमे, वेब सीरिज प्रदर्शित होणार याबद्दल जाणून घेऊ या.

स्पायडर मॅन

स्पायडर मॅन


ऑस्करमध्ये नॉमिनेट झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला भरूभरून प्रतिसाद दिला होता. परंतु हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झालेला नव्हता. त्यामुळे तो पाहण्यासाठी प्रेक्षकांना खूप काळ प्रतिक्षा करावी लागली. ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहता आला नाही, अशांना हा सिनेमा ओटीटीवर पाहता येणार आहे. हा सिनेमा लवकरच हॉटस्टार डिस्ने या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

प्रियांका चोप्राची आई ‘चंद्रमुखी’च्या प्रीमियरला उपस्थित, पाहा अजून कोण कोण आलं होतं ते

द वाइल्ड सिझन २

द वाइल्ड सिझन २

द वाइल्ड सिझन २ हा सिनेमा येत्या ६ मे रोजी अॅमेझोन प्राईमवर रिलीज होणार आहे. सिझन २ मध्ये प्रेक्षकांना पहिल्या सिझनमधील सस्पेन्सचं उत्तर मिळणार आहे. ज्यांनी हे दोन्ही सिझन पाहिलेले नाहीत त्यांना अॅमेझोनवर पाहता येणार आहे.

हू किल्ड सारा सिझन ३

हू किल्ड सारा

हू किल्ड सारा या वेब सीरिजचा तिसरा भाग १८ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स ओरिजिनल मॅक्सिकन मिस्ट्री थिलर सीरिज खूपच उत्कंठावर्धक आहे. या सीरिजचा प्रीमियर २४ मार्च २०१२१ रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून प्रेक्षक त्याची आतुरतेनं वाट बघत आहेत.

झुंड

झुंड

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड या सिनेमाची खूप चर्चा होती. सिनेमाची अनेकजण आतुरतेनं वाटही बघत होते. हा सिनेमा लवकरच झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. या वीकेंडला हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

पेट पुराण

पेट पुराण

हा मराठी सिनेमा वर्किंग कपलच्या विचारप्रक्रियेवर आधारीत आहे. कामात गळ्यापर्यंत बुडालेल्या नवरा-बायकोंना मौज-मजेत राहण्याची आवड असते. त्यातच ते आनंदित असतात. या आनंदात रहायचं असल्यानं त्या दांपत्याला ना मुलं हवीत ना कुटुंब. हा सिनेमा येत्या ६ मे रोजी सोनी लिववर प्रदर्शित होणार आहे.

Alia Bhatt ची बहीण आणि नणंद करिश्मामध्ये झालं होतं भांडण

याशिवाय मे महिन्यामध्ये द काश्मीर फाइल्स, केजीएफ हे सिनेमे देखील ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here