सीबीआय मुख्यालयातील टीमने मुंबई युनिटसह आज सकाळी राज्यातील दोन प्रमुख शहरांतील आठ ठिकाणी छापे टाकले. पुण्यात अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (ABIL) परिसरात छापेमारी करण्यात आली. तसंच 2G घोटाळ्यात नाव आलेल्या शाहिद बलवा यांच्या कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले. सीबीआयच्या टीमने ज्या तीन उद्योगपतींच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत ते तीनही उद्योगपती राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंगही दिला जाण्याची शक्यता आहे.
अविनाश भोसलेंवर ईडीनेही केली होती कारवाई
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. तसंच राज्यातील एका मोठ्या राजकीय कुटुंबाचे ते नातेवाईकही आहेत. अविनाश भोसले यांच्यावर ईडीने काही महिन्यांपूर्वी फेमा कायद्याअंतर्गत कारवाई करत जवळपास ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुणे आणि नागपूरमधील मालमत्तांचा यामध्ये समावेश होता.