मुंबई : छोट्या पडद्यावर अभिनय करणारे कलाकार हे रोज घराघरात पोहोचत असल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढतच असते. मुळातच मनोरंजन क्षेत्रातील कलाकार हे पैसा आणि प्रसिद्धीच्या वलयात असतात. स्टारडम टिकवण्यासाठी त्यांना मिळवलेला पैसा लाइफस्टाइलवर खर्चही करावा लागतो. मग कधी कधी अभिनयाव्यतिरिक्त काही कलाकार त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातही गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक त्यांना ज्यादाची कमाई करून देतात. सध्याच्या टीव्ही स्टारपैकी काही कलाकार असे आहेत ज्यांनी अभिनय थांबवला तरीही त्यांच्या कमाईचा आकडा वाढतच राहील. हे कलाकार काही पर्यायी व्यवसाय करतात ज्यामुळे त्यांची कमाई लाखाच्या घरात जाते.

रुपा गांगुली

अनुपमा या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रूपा गांगुली सध्या महिलावर्गात लोकप्रिय आहे. मराठीतील आई कुठे काय करते मालिका अनुपमा या मालिकेचा रिमेक आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली आहे. अभिनेत्री असण्याबरोबच रूपाने तिचा वेगळा व्यवसायही सुरू केला आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या जाहिरात एजन्सीची मालक म्हणून रूपाची ओळख आहे, जी खूप कमी जणांना माहिती आहे. जाहिरात एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनमुळे तिची चांगली कमाई होते.

प्रियांका चोप्राची आई ‘चंद्रमुखी’च्या प्रीमियरला उपस्थित, पाहा अजून कोण कोण आलं होतं ते

करण कुंद्रा

बिग बॉसच्या १५ व्या सीझनमधील एक चर्चेतला स्पर्धक म्हणून करण कुंद्रा हे नाव अनेकांपर्यंत पोहोचलं. याच पर्वाची विजेती तेजस्वी प्रकाशसोबत करणचं नाव जोडल्यानेही तो चर्चेत आला होता. डान्स दिवाने ज्युनिअर या शोमध्ये करणने लक्ष वेधून घेतले. छोट्या पडद्यावर करणचा जबरदस्त चाहतावर्ग आहे. करणच्या खात्यात अभिनय, डान्स या कलाकारीतूनच पैसे येतात असं नाही तर त्याने सुरू केलेल्या इंटरनॅशनल कॉल सेंटरमुळेही त्याला पैसे मिळतात. जालंधरमध्ये हे कॉलसेंटर आहे ज्यामध्ये करणची आर्थिक गुंतवणूक आहे.

मौनी राॅय

टीव्हीस्टार अभिनेत्री आणि मॉडेल मौनी रॉय हिने आता मोठ्या पडद्यावरही आपली ओळख सिद्ध केली आहे. पण मौनीला खरी ओळख मिळाली ती टीव्ही मालिकांमुळेच. तिच्या स्टाइलमुळे मौनी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री म्हणून मौनी चांगली कमाई करतेच पण यासोबतच ती एक व्यवसायही करते. नवरा सूरज नांबियारसोबत मौनीने एक शैक्षणिक संस्था सुरू केली आहे. या माध्यमातून मौनीची अभिनयाशिवायही आर्थिक कमाई होते.

संजिदा शेख

क्या होगा निम्मो का या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करणाऱ्या संजिदा शेखनेही तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अभिनयासोबत संजिदा सध्या डिजिटल जगात ओळख प्रस्थापित करत आहे. पण अभिनयाशिवाय तिला आर्थिक कमाई देत आहे तो पार्लरचा व्यवसाय. संजिदाज ब्युटी पार्लरमधून तिचा बँक बॅलन्स वाढत आहे. मुंबईमध्ये संजिदाच्या पार्लरच्या शाखा विस्तारल्या आहेत.

अमिताभ बच्चन- अजय देवगणचा Runway 34 पाहून प्रेक्षक सैराट, म्हणाले…

रोनित राॅय

सिनेमा ते टीव्ही असा प्रवास करत अभिनेता रोनित रॉय आज एक यशस्वी अभिनेता बनला आहे. कसोटी जिंदगी की या मालिकेतील मिस्टर बजाज ही त्याची भूमिका आजही लक्षात आहे. टीव्हीस्टार असलेला रोनित आज एका सिक्युरिटी एजन्सीचा मालक आहे. रोनितच्या या एजन्सीमधून अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अक्षय कुमार, करण जोहर यासारख्या सेलिब्रिटींना सुरक्षा रक्षक पुरवण्याचं काम केलं जातं. या व्यवसायातून रोनितला मिळणारी कमाई लाखांच्या घरात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here