औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा उद्या ( रविवारी ) औरंगाबाद इथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी मनसेचे अनेक नेते औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा औरंगाबादमध्ये आले असून, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या एका टीकेला उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची अवस्था आमिर खानच्या चित्रपटातील गजनी सारखी झाली असल्याचा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते, असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात येत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले की, ‘मला वाटतं त्यांचं मेमरी कार्ड डिलीट झालं आहे. तर उद्धव ठाकरेंची अवस्था आमिर खानचा चित्रपटातील गजनी सारखी झाली आहे. कारण, ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये व्यस्त होते. पण त्याचवेळी राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत फिरून शिवसेना वाढवण्याचं काम करत होते. पण कदाचीत उद्धव ठाकरे यांना हे आठवत नसावं’, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

वसंत मोरेंनी मनसे सोडल्याची चर्चा; राज ठाकरेंच्या दौऱ्यातील अनुपस्थितीबद्दल महत्त्वाची माहिती समोर
पायाखालची वाळू सरकली…

याचवेळी बोलताना संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, ‘२ एप्रिल रोजी झालेल्या सभेनंतर राज ठाकरे यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. तेव्हापासून सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला नोटीस कशासाठी देत आहे तर हनुमान चालिसा म्हणाल तर याद राखा. त्यामुळे हे कसले हिंदुत्ववादी नेते आहेत यातूनच त्यांची मानसिकता कळते. ज्यावेळी तुम्ही हनुमान चालीसाला विरोध करत आहात, त्यावेळी तुम्हाला हिंदू मधला ‘ह’म्हणायचा हक्क नाही’ अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

महाराष्ट्र हादरला! क्लिनिकमध्ये छापा टाकताच खळबळ, दृश्य पाहून सगळेच चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here