मुंबई: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून कालच्या १५७४ रुग्णांमध्ये आज आतापर्यंत आणखी ९२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या १६६६ वर पोहोचली आहे. नव्यानं लागण झालेल्यांमध्ये एकट्या मुंबईतील ७२ जणांचा समावेश आहे.
कालच्या दिवसात राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१० नं वाढला होता. हा आतापर्यंतचा एका दिवसातील उच्चांक होता. मात्र, आज सकाळपर्यंत तब्बल ९२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं चिंता वाढली आहे. नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील ७२, मालेगाव ५, ठाणे ४, औरंगाबाद, नाशिक व पनवेल येथील प्रत्येकी दोन तर, कल्याण-डोंबिवली, अहमदनगर, पुणे आणि वसई-विरारमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times