सांगली : राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाल्यापासून गावा-गावात शर्यतींचं आयोजन करण्यात येत आहे. अशात सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शर्यतीमध्ये बैलगाडी भरकटून तीनजण जखमी झाले. या भीषण अपघाताचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पलूस या ठिकाणी ही घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. फक्त तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. परिसरातल्या धोंडीराज यात्रे निमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. शर्यतीमध्ये अनेक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.

वसंत मोरेंनी मनसे सोडल्याची चर्चा; राज ठाकरेंच्या दौऱ्यातील अनुपस्थितीबद्दल महत्त्वाची माहिती समोर
बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर एका बैलगाडीचा “जु”मोडला. त्यामुळे बैलगाडी चालकाचा ताबा सुटून बैल भरकटले आणि बैलगाडी थेट कडेला उभारलेल्या गर्दीत घुसली. ज्यामध्ये तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ पलूसच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.

वेळीच बैलगाडी चालकाने बैलांना आवरल्याने मोठी दुर्घटना टळली. तर बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर काही तरुण मोबाईलवर चित्रीकरण करण्यासाठी पुढे गेले होते आणि याच तरुणांच्या अंगावर भरकटलेली बैलगाडी गेली आणि तीनजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंची अवस्था ‘गजनी’ सारखी, मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here