मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केएल राहुल हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. हे लवकरच लग्न करणार आहेत., परंतु त्याआधी अथिया आणि राहुल लिव इन रिलेशनमध्ये राहणार आहेत. त्यासाठी त्यांनी एक भाड्याचं घरही घेतलं असून त्याचं महिन्याचं भाडं १० लाख रुपये असल्याचं समोर आलं आहे. अथिया आणि राहुल यांचं चार बीएचकेचं भाड्याचं घर वांद्रे येथील कार्टर रोडवर आहे.परंतु आता बातमी अशी समोर आली आहे की, या दोघांनी आलिय भट्ट आणि रणबीर कपूरयांच्या ‘वास्तू’च्या बाजूलाच घर विकत घेतलं आहे. त्यामुळे ते दोघंजण रणबीर आणि आलियाचे शेजारी होणार आहेत.


अथिया आणि राहुल यांनी विकत घेतलेलं हे घर पाली हिल येथील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावर आहे. या घराचं रिनोवेशन होईपर्यंत ते दोघंजण भाड्याच्या घरात राहणार आहेत. अथियाची आई माना शेट्टी ही या नवीन घराचं संपूर्ण रिनोवेशनचं आणि घराच्या डेकोरेशनचं काम करणार आहे.

‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं आस्ताद काळे संतप्त,म्हणाला-

घर नेमकं विकत घेतलं कुणी?

पाली हिल येथील संधु पॅलेसमधील अपार्टमेंटमध्ये अथिया आणि केएल राहुल एकत्र राहणार आहेत. अर्थात या बिल्डिंगचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही. ही बिल्डिंग रणबीरच्या ‘वास्तू’ घराच्या बाजूला आहे. काही न्यूज पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार सुनील शेट्टीनं त्याच्या मुलीसाठी हे घर विकत घेतलं आहे. कारण या बिल्डिंगमध्ये तो मुलगी आणि बायकोबरोबर आला होता. तर काहींच्या मते हे घर केएल राहुलनं विकत घेतलं आहे.

Paatal Lok 2: जयदीप अहलावतनं हाथीराम चौधरीच्या भूमिकेसाठी घेतलं ५० पट जास्त

अथिया राहुल

याच वर्षी करणार अथिया आणि राहुल लग्न

दरम्यान, राहुल आणि अथिया हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेम असल्याचं जाहीर केलं आहे. टीम इंडियाच्या अनेक मॅचेस वेळी अथिया स्टेडिअमवर हजर असायची. इतकंच नाही तर अथिया आणि राहुलनं एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केलं आहे. आता हे दोघंजण डिसेंबर २०२२ मध्ये एकमेकांच्या साथीनं नवीन आयुष्याची सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here