नाशिक : राज्य सरकारने पुण्यातील येरवडा येथे नव्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने समाज माध्यमांवर या निर्णयाची जोरदार जाहिरातबाजीही सुरू केली आहे. परंतु, या जाहिरातीत सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांच्या छबीचा वापर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Ncp Nawab Malik News)

राज्य सरकारने सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून, येरवडा येथे शासकीय आयटीआय सुरू करण्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. या आयटीआयमध्ये १८ तुकड्या सुरू केल्या जाणार आहेत. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यासाठी २३ शिक्षक आणि १७ शिक्षकेतर अशा एकूण ४० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

वीज समस्येवर रोज नवी कारणे; काँग्रेस नेत्याची मोदी सरकारवर टीका

आयटीआयचा कारभार ज्या विभागाच्या अंतर्गत येतो, अशा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्याकडे जबाबदारी होती. मात्र, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांच्यावर ‘ईडी’कडून कारवाई झाली. त्यामुळे सध्या आर्थर रोड कारागृहात असलेल्या मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य शिक्षण व उद्योजकता विभागाचा अतिरिक्त कार्यभार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे, तर अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आला.

दरम्यान, आघाडी सरकारमध्ये बिनखात्याचे मंत्री असलेल्या मलिक यांची येरवडा आयटीआयच्या जाहिरातीमध्ये छबी वापरल्याने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे पुरते हसे झाले आहे. संबंधित जाहिरातीत मलिक यांच्या नावाखाली अल्पसंख्याक मंत्री असा उल्लेख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here