अकोला: करोनाचा संशयित म्हणून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णानं आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

मोहम्मद जहरुल इस्लाम (वय ३० वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा आसामच्या नागाव जिल्ह्यातील सालपडा येथील रहिवासी आहे. करोना संशयित म्हणून ७ एप्रिल रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची पुढी तपासणी करण्यात आली होती. शुक्रवारी मिळालेल्या चाचणी अहवालात हा रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळं आलेल्या नैराश्यातून त्यानं हे पाऊल उचललं असावा, असा अंदाज आहे.

वाचा:

वाचा:

आज पहाटेच्या सुमारास मोहम्मद रक्तबंबाळ अवस्थेत बाथरूममध्ये आढळला. कर्मचाऱ्यांनी ही माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली. त्यानंतर तातडीनं त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला, असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here