Congress Agitation : सध्या देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाच्या किंमती तर गगनाला भिडल्या आहेत. याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक होतोना दिसत आहेत महागाईच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर टीका होत असल्याचे दिसत आहे. आज या वाढत्या महागाईच्या विरोधात परळीमध्ये काँग्रेसच्या वतीने भोंगा आंदोलन करण्यात आले. जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत जनतेला बुरे दिन दाखवण्याचे काम मोदी सरकारने केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
 
सध्या देशात पेट्रोल, डिझेल, गॅस आशा अनेक वस्तूंच्या किंमती वाढत चालल्या आहेत. या किंमत वाढीच्या विरोधात परळी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने राठोड पेट्रोल पंपासमोर भोंगा दाखवून आंदोलन करण्यात आले. यावेळी  केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधनाच्या किंमतीत वाढ करुन मोदी सरकारने जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ते पंतप्रधानांनी सांगत होते की पेट्रोल डिझेलच्या दर कमी करा. आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असून तेच मुख्यमंत्र्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास सांगत आहेत. त्यामुळे जर महागाई कमी नाही झाली तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

महागाईचा सामना करत असलेल्या जनेतवरील दरवाढीचा बोझा आणखी वाढणार आहे. आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 104 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात नसून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. मागील महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 268.50 रुपये वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑइल कंपनीच्या दरानुसार,  दिल्लीत 19 किलोच्या LPG सिलेंडरसाठी 2355.50 रुपये मोजावे लागतील. 30 एप्रिलपर्यंत केवळ 2253 रुपये इतकी एका सिलेंडरची रक्कम होती. कोलकात्यात 2351 ऐवजी 2455 रुपये, मुंबईत 2205 ऐवजी 2307 रुपये खर्च करावे लागणार आहेत. चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. दरम्यान, भारतीय तेल कंपन्यांनी नवे इंधन दर जारी केले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत. त्यामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रतिलिटर तर मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलचा दर दिल्लीत 96.67 रुपये प्रतिलिटर आणि मुंबईत 104.77 रुपये प्रतिलिटर आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here