चंदीगढ :पंजाब पोलिसांना (Punjab Police) पतियाळा हिंसाचाराच्या (Patiala Clashes) तपासात मोठं यश मिळालं आहे. पंजाब पोलिसांनी मुख्य आरोपी बरजिंदर सिंह परवाना याला अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी राज्यभरात शोधमोहीम राबवण्यात आल्यानंतर परवाना याला मोहालीमधून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी काल प्रसिद्धीमाध्यमांना बरजिंदर सिंह परवाना हा पतियाळातील दोन गटातील हिंसाचाराचा मुख्य आरोपी असल्याची माहिती दिली होती. पंजाब पोलिसांनी परवाना याला आज सकाळी मोहालीमधून अटक केली आहे.
Uddhav Thackeray: ‘असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत’, मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
पंजाबच्या पतियाळा मध्ये शुक्रवारी काली मंदिर येथे शिवसैनिकांचा गट आणि खलिस्थान समर्थकांचा गट यामध्ये हिंसा झाली होती. बरजिंदर सिंह परवाना याला मोहाली येथे अटक करण्यात आली आहे. पतियाळा हिंसाचारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.पतियाळा हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

पंजाबमधील स्थानिक शिवसैनिक हरिश सिंगला यांनी खलिस्तान विरोधात मोर्चा काढायचा होता. प्रशासनानं त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. बरजिंदर सिंह परवाना हे खलिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर हिंसा झाली. या घटनेनंतर हरिश सिंगला यांना शिवसेनेतून हटवण्यात आलं आहे. सिंगला यांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. आज बरजिंदर सिंह परवाना याला आज अटक करण्यात आली आहे.

बरजिंदर सिंह परवाना याच्या अटकेसाठी पोलिसांनी २० पथकं तयार केली होती. पंजाब सरकारनं या घटनेची गांभीर्यानं दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पंजाब सरकारनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. पतियाळातमध्ये शनिवारी आणि आज स्थिती सामान्य झाली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या नेत्यांना अटक केल्यानं स्थिती सामान्य होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पतियाळामधील तणाव कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर भावनिक झाला खेळाडू; पाहा व्हिडिओ
पजांब पोलिसांचे आयजी एमएस छीना यांच्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. कालपर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये हरीश सिंगला, कुलदीप सिंह दंथल आणि दलजीत सिंह यांचा समावेश होता. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेतील दोषींना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.

286 COMMENTS

  1. prednisone 40 mg tablet [url=http://prednisonepills.pro/#]Prednisone 20 mg buy online[/url] prednisone 60 mg price

  2. Everything what you want to know about pills. Drugs information sheet.
    [url=https://viagrapillsild.online/#]best viagra[/url]
    Read here. Commonly Used Drugs Charts.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here