अमृता फडणवीस या अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आणि बोचरी टीका करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत ट्विट केले होते. हे ट्विट त्यांनी डिलीट केले होते. मात्र, त्यानंतर शिवसेनेच्या दीपाली सय्यद या अमृता फडणवीस यांना सातत्याने त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
‘योगी होण्यासाठी फडणवीस बायकोला सोडणार का?’,
“ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !” अशा शब्दात ट्वीट करत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते प्रचंड आक्रमक झाले होते. याच मुद्द्यावरून दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्या म्हणाल्या की, ‘योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?’ असा सवाल दीपाली सय्यद यांनी विचारला होता.