नवी दिल्ली :रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अधिकारी दलीप सिंह, राष्ट्रपती जो बायडन यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यावर भारताला इशारा दिला होता. रशियाच्या विरोधात भारतानं भूमिका घ्यावी, असं अमेरिकेला वाटत होतं. मात्र, भारतानं त्याला प्रतिसाद दिला नाही. भारत आणि रशियाच्या मैत्रीमुळं क्वाड संघटनेमध्ये दक्षिण कोरियाला प्रवेश मिळू शकतो. दक्षिण कोरियाला क्वाड संघटनेचं सदस्यत्व दिल्यास भारताच्या स्थानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Russia Ukraine War: पुतिन ‘पूर्ण युद्ध’ जाहीर करण्याची शक्यता; ९ मे रोजी नेमकं काय होणार?
क्वाड संघटनेत अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. आशिया टाइम्सच्या बातमीनुसार दक्षिण कोरिया चीनच्या हालचाली नियंत्रित करण्यासाठी क्वाडमध्ये प्रभावी भूमिका निभावू शकतो. दक्षिण कोरियाचे गेल्या काही दिवसांपासून चीनशी चांगले संबंध राहिले आहेत. मात्र, दक्षिण कोरियातील नवनिर्वाचित राष्ट्रपतीन यून सुक येओल त्यांची भूमिका बदलू शकतात. हिंदी महासागरासंदर्भात दक्षिण कोरिया त्यांची भूमिका बदलू शकतो. भारतानं रशिया संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळं क्वाड संघटनेत दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.

जो बायडन प्रशासनानं नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह इतर नेत्यासोबत चर्चा केल्यानंतर भारताला रशियाशी संबंधावरुन इशारा दिला आहे. भारताच्या भूमिकेमुळं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर लावलेले निर्बंध कमजोर होऊ शकतात, अशी भीती अमेरिकेनं व्यक्त केली होती. भारतानं अमेरिकेसोबत मैत्री ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यासाठी रशियाला सोडणार नसल्याचं मत मांडलं आहे.
तिबेटविषयी नेहरूंना दोष देता येणार नाही; निर्वासित सरकारच्या अध्यक्षांनी मांडली भूमिकाभारतानं रशिया यूक्रेनचा प्रश्न चर्चेतून सोडवण्याची भूमिका मांडली होती. भारताच्या भूमिकेमुळं क्वाड संघटनेत भारताच्या स्थानाला पर्याय निर्माण होत असल्याचं चित्र आहे. दक्षिण कोरिया क्वाड संघटनेमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. दक्षिण कोरिया देखील लोकशाही देश असून मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्यात करतो. हिंदी आणि पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकेचा सहयोगी देश असल्यानं दक्षिण कोरियाचं महत्त्व वाढण्याची शक्यता आहे.

क्वाड संघटनेत सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारताचा समावेश आहे. क्वाड संघटनेच्या संदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय झाल्यास दक्षिण कोरिया देखील क्वाडमध्ये सहभागी होऊ शकते. दक्षिण कोरिया क्वाडमध्ये सहभागी झाल्यास भारताचं क्वाडमधील महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here