कल्याण: राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा यशस्वी झाली पाहिजे. राज ठाकरे यांना आजपर्यंत कुठेही विजय मिळाला नाही. किमान इथे तरी ते विजयी होऊ देत, असे खोचक वक्तव्य शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी केले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेमुळे हिंदू आणि मुस्लीम समाज विभागला जाईल. काही हिंदू राज ठाकरे यांच्या पाठी जातील. तर काही मुस्लीम असदुद्दीन ओवेसी यांच्या मागे जातील. मात्र, या सगळ्यात गरीब माणूस भरडला जाईल, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले. त्या रविवारी कल्याणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी दिपाली सय्यद यांनी भोंगे आणि हनुमान चालीसा पठणावरून सुरु असलेल्या राजकारणासंदर्भात भाष्य केले. महाराष्ट्रात सगळेजण एकत्र राहतात. सगळ्या जातीधर्मांचे लोक येथे एकत्र नांदतात. आपण सगळे सण एकत्र साजरे करतो. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण सुरु झाले. अमरावतीहून राणा दाम्पत्याने मुंबईत येऊन याच मुद्द्यावरून राजकारण सुरु केले. कोण काय राजकारण आणि कशासाठी करते, हे सगळ्यांना माहिती आहे, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले.

सध्या ज्या काही गोष्टी सुरु आहेत त्याचा परिणाम गरिबांवर होतो. काहीजण राज ठाकरे यांच्यासोबत जातील, काहीजण ओवेसी यांच्यापाठी जातील. पण त्यानंतर तळागाळातील समाज एकमेकांसोबत भांडत राहील. दंगली होणार, यामध्येच सगळं संपणार. त्यामुळे कोणाच्या सभा यशस्वी करायच्या, याचा विचार लोकांनी केला पाहिजे, असेही दीपाली सय्यद यांनी म्हटले.
‘फडणवीसांनी घरात बांधलेली ‘म्हैस’ शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये, अन्यथा…’

‘फडणवीसांनी घरात बांधलेली ‘म्हैस’ शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये’

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. त्यांनी अमृता फडणवीस यांना थेट म्हशीची उपमा दिली. त्या रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी म्हटले की, आता मामी ऐकत नाहीत. मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एवढेच सांगायचे आहे की, घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या (Shivsena) वाटेवर सोडू नका. नाही तर ‘पुन्हा येईन’,’पुन्हा येईन’ तसंच राहून जाईल. शिवसेना काही ऐकणार नाही. त्यामुळे ‘पुन्हा येईन’ हा शब्द हवेतच विरेल, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले. आता या टीकेला अमृता फडणवीस आणि भाजपचे नेते कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

VIDEO | “अमृता फडणवीस घरात बांधलेली म्हैस”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here