भारतीय वंशाच्या खासदार नादिया व्हिटोम आणि मजूर पार्टीच्या खासदारांनी जॉन्सन यांच्या गुजरात दौऱ्यातील फोटोसेशन संदर्भात प्रश्न उपस्थित केलं आहे. गुजरातच्या हलोल येथील जेसीबीच्या कंपनीला भेट देऊन बोरिस जॉन्सन यांनी फोटो सेशन केलं होतं. ब्रिटनच्या खासदारांनी जहांगीरपुरीमध्ये झालेल्या दोन गटातील हिंसाचाराच्या घटनेनंतर उत्तर दिल्ली महापालिकेनं अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु केली होती. त्यामध्ये जेसीबीचा वापर करण्यात आला होता. जहांगीरपुरीतील कारवाईचा वाद भारताच्या सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. सु्प्रीम कोर्टानं उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.
ब्रिटीश संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्कॉटिश नॅशनल पार्टीचे सदस्य इयान ब्लॅकफोर्ड संसदेत एक प्रश्न मांडला. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत दौऱ्यातील चर्चेसंदर्भात कनिष्ठ मंत्री उत्तर देत होत्या, त्यावेळी इयान ब्लॅकफोर्ड यांनी पंतप्रधान कुठं आहेत, असा सवाल केला होता.
विकी फोर्ड यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा भारत आणि ब्रिटनमधील व्यापारी सहकार्य वाढवू शकेल. मानवाधिकाराला महत्त्व देणारा मुद्दा देखील त्या दौऱ्यामध्ये महत्त्वाचं स्थान होतं. विकी फोर्ड यांनी आम्ही मानवाधिकाराला दुर्लक्षित करुन व्यापाराला प्राधान्य दिलं जाणार नाही, असं म्हटलं. काही प्रश्न असल्यास आम्ही भारत सरकारशी बोलू असं विकी फोर्ड यांनी म्हटलं. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना ब्रिटनच्या संसदेत पार्टीगेटवरुन देखील अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. करोना काळातील पार्टी प्रकरणी जॉन्सन अडचणीत आले होते.