Raj Thackeray | मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर वसंत मोरे यांनी आपल्या प्रभागातील मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करण्यास नकार दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे मनसेच्या गोटात वादळ निर्माण झाले होते.

 

Vasant More Raj Thackeray (1)
Vasant More | आजची ही सभा राज ठाकरे आणि मनसे दोघांसाठीही महत्त्वाची आहे. या सभेच्या व्यासपीठावर वसंत मोरे हेदेखील असतील.

हायलाइट्स:

  • औरंगाबादमधील सभेसाठी मनसेने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे
  • ही सभा राज ठाकरे आणि मनसे दोघांसाठीही महत्त्वाची आहे
औरंगाबाद:राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेशी फारकत घेतल्यामुळे चर्चेत आलेले मनसेचे नेते वसंत मोरे हे आजच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात वसंत मोरे (Vasant More) मोजक्याच कार्यक्रमांना हजर होते. त्यांची ही गैरहजेरी अनेकांना खटकली होती. त्यामुळे वसंत मोरे मनसे सोडणार का, या चर्चेला पुन्हा हवा मिळाली होती. अशातच वसंत मोरे हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेला जाणार नसल्याचीही आवई उठली होती. मात्र, वसंत मोरे यांनी आपण रविवारी औरंगाबादमध्ये पोहोचू, असे स्पष्ट केले होते.

त्याप्रमाणे वसंत मोरे हे काहीवेळापूर्वीच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. औरंगाबादमधील सभेसाठी मनसेने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे आजची ही सभा राज ठाकरे आणि मनसे दोघांसाठीही महत्त्वाची आहे. या सभेच्या व्यासपीठावर वसंत मोरे हेदेखील असतील. त्यामुळे राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यातील वितुष्ट कायम असल्याची चर्चा तुर्तास तरी निकालात निघाली आहे.

राज ठाकरेंनी तात्यांना थांबवल्याची इन्साईड स्टोरी

वसंत मोरे अजूनही मनसेवर नाराज असल्याची चर्चा का रंगली?

राज ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले होते. मनसेच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. पण यात वसंत मोरे (Vasant More) कुठेच न दिसल्याने चर्चांना उधाण आले होते. वसंत मोरे हा मनसेचा पुण्यातील प्रमुख चेहरा आहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीची चर्चा होणे साहजिक होते.अखेर वसंत मोरे हे वढू बुद्रुक तुळापूर इथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या ठिकाणी पोहोचले होते. याठिकाणी त्यांची राज ठाकरे यांच्याशी भेट झाली. त्यानंतर वसंत मोरे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपण औरंगाबादला जाणार असल्याचे सांगितलो होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns leader vasant more arrive at aurangabad for mns chief raj thackeray rally
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here