औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात मी सभा घेतली असती ती तुम्ही दूरदर्शनवरुन पाहिली असती. मी मुंबईत २ एप्रिलला सभा घेतली. त्यासभेनंतर काही जण बडबडायला लागले. यानंतर मी १२ एप्रिलला उत्तर सभा घेतली. मी दोन सभा घेतल्या त्यावर किती बोलत आहेत. मी ठाण्यात सभा घेतल्यानंतर दिलीप धोत्रे यांनी मला संभाजीनगरला सभा घेण्यासाठी फोन केला. संभाजीनगरला सभा घेऊयात तारीख सांगतो, असं म्हणालो. हा विषय संभाजीनगरपुरता मर्यादित नाही, माझ्या या पुढच्या सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे, विदर्भात जाणार, कोकणात जाणार, उत्तर महाराष्ट्रात जाणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

मला कल्पना आहे महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. मात्र,आजचे प्रमुख विषय आहेत त्यासंदर्भात मी बोलणार आहे. जो जो समाज इतिहास विसरला त्याच्या भूगोल सरकलेला आहे. आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण मराठी आहोत. महाराष्ट्रानं या देशाला, भूमीला काय काय दिलं. आमजे ज्ञानेश्वर गेल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी इथं आला, देवगिरीच्या किल्ल्यात शिरला. खिलजीनं एक लाख लोकं येणार म्हणून सांगितलं. खिलजी हजार लोकं आली. अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य येतंय ही महाराष्ट्रातील पहिली फेक न्यूज आहे.
‘भोंगे काढायले सांगितले, तर हातभर फाटली आणि हे म्हणतात बाबरी आम्ही पाडली’
आमच्या महाराष्ट्राची कन्या, रामदेवराय यादवाच्या मुलगीला अल्लाउद्दीन खिलजी घेऊन गेला. पुढची ४०० वर्ष महाराष्ट्र अंधाकारात होता. एकनाथ महाराजांनी दार उघड बये दार उघड अशी आरोळी दिली. १६३० ला दार उघडलं आणि आमच्या छत्रपतींचा जन्म झाला. स्वाभिमानानं कसं आणि काय जगायचं असतं हे आमच्या राजानं शिकवलं. नरहर कुरुंदकर यांच्या पुस्तकात त्यांचा छान उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं कोण होते. शिवाजी महाराज म्हणजे आपण काय विचार करतो, अफजलखानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोट, आग्र्याहून सुटका, महाराजांचं आयु्ष्य केवळं ५० वर्ष होतं. शिवाजी महाराजाचांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला. संभाजी महाराज त्यांच्याशी लढले. पुढची २७ वर्ष तो लढला आणि त्याचा मृत्यू झाला. संताजी धनाजी, राजाराम महाराज आणि ताराबाई हे लढले. औरंगजेबानं जी पत्र पाठवली त्यात तो म्हणतोय, शिवाजी अजून मला छळतोय, असं औरंगजेब म्हणाला. शिवाजी महाराज हा विचार हे औरंगजेबाला कळलं होतं. मराठेशाहीचा इतिहास आपण विसरलो आहोत, असं राज ठाकरे म्हणाले.
बाबरीच्या आंदोलनात १८ दिवस बदायूंच्या तुरुंगात होतो, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
आमच्या लोकांच्या अंगामध्ये देवी येते, भूत येतात काही गोष्टी होतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या समाजाच्या अंगात शिवाजी नावाचं भूत येईल तेव्हा अख्ख जग पादांक्रात करु, असं म्हणाल्याचं राज ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here