निकोलाई पेत्रुशेव हे रशियाच्या युद्ध रणनीतीचे प्रमुख मानले जातात. व्लादिमीर पुतीन यांनी पेत्रुशेव यांच्या सल्ल्यानंतर यूक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचे आदेश दिले. पेत्रुशेव यांच्या सल्ल्यानंतर पुतीन यांनी संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि सेना प्रमुख जनरल वालेरी गेरासिमोव यांना बोलवून यूक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. पुतीन आणि पेत्रुशेव यांच्यातील गुप्त बैठकीची माहिती देखील दिमीत्री मेदवदेव, पंतप्रधान मिखाइल मिशुस्तीन यांना नव्हती.
व्लादिमीर पुतीन यांच्यावर कर्करोगावरील शस्त्रक्रिया होणार असल्याचा दावा टेलिग्राम चॅनेल एसवीआरवर करण्यात आला आहे. रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयातील सूत्रांनी ही माहिती दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुतीन यांना गेल्या १८ महिन्यांपासून पोटाचा कर्करोग आणि पार्किन्सनचा आजार आहे. पुतीन यांनी पहिल्या सर्जरीला उशीर केला होता. मात्र, रशियाच्या ९ मेच्या विक्टरी डे परेड नंतर पुतीन यांच्यावर कर्करोगावरील शस्त्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती आहे. दुसऱ्या महायुद्धातील रशियाच्या सैन्याच्या शौर्याची आठवण म्हणून ९ मे रोजी विक्टरी डे परेडचं आयोजन केलं जातं.
एसवीआरनं केलेल्या दाव्यानुसार पुतीन यांच्यावरील शस्त्रक्रिया एप्रिल महिन्यातील दुसऱ्या पंधरावड्यात होणर होती. मात्र, यूक्रेन विरोधातील युद्धामुळं ते होऊ शकलेलं नाही. आता पुतीन यांच्यावर दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी तारीख निश्चित करण्यात येत आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध २४ फेब्रुवारीला सुरु झालं होतं. युद्ध सुरु होऊन ६७ दिवस होऊन गेलं तरी युद्ध थांबवण्याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही.