मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोना झपाट्यानं फैलावत आहे. शनिवारी एका ८० वर्षीय व्यक्तीचा करोनानं मृत्यू झाला. त्यामुळं धारावीतील मृतांची एकूण संख्या पाचवर पोहोचली आहे. तर सहा नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एकूण २८ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
‘८० वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. धारावीतील करोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा चारवर पोहोचला आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाची बाधा झालेले नवे सहा रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे.
नव्या रुग्णांमध्ये दिल्लीत तबलिग जमातच्या कार्यक्रमाहून परत आलल्या दोघांचा समावेश आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसांत ११ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यात तीन महिला आहेत. आज सापडलेल्या सहा नव्या रुग्णांमध्ये पाच जण हे मुकुंद नगरचे रहिवासी आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times