औरंगाबाद : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी समान नागरी कायद्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘भारताच्या संविधानामध्ये पार्ट-४ डायरेक्टर प्रिंन्सिपल आहे. या मध्यदेशात सर्वत्र दारू बंदी करणे बंधनकारक आहे. पण हे दारू बंद करीत नाहीत. कारण सायंकाळचे ६ वाजले की हे सर्व जण टूल होतात’, अशी टीका खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

भारतातील ९० टक्के पैसा १५ ते २० लोकांकडे आहे

आर्टिकल ४७ वाचा भारतात सर्व नागरिकांचे आर्थिक उत्पन्न हे समान असायला हवं. भारतातील ९० टक्के पैसा १५ ते २० लोकांकडे आहे, असंही ते यावेळी म्हणाले. गोवा राज्यामध्ये लग्न झाल्यानंतर मूल-बाळ होत नसेल तर पत्नीचे वय २५ ते ३० असेल तर पती मूल होण्यासाठी दुसरं लग्न करू शकतो. नॉर्थईस्ट मध्य ,मिझोराम, नागालँड, मेघालय, आसाम, हिमालय या राज्यात मध्य संस्कृतीसाठी संविधानामध्ये सुरक्षा दिली आहे. नॉर्थईस्ट मध्य एक महिला २ ते ३ पुरुषासोबत लग्न करू शकतात. हे सर्व मिटवणार का?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

समृद्धीच्या दृष्टीने युरोपीय देश महत्त्वाचे सहकारी : पंतप्रधान मोदी
दारू बंद करा सर्वांचे आर्थिक उत्पन्न एक करा

पण फक्त मुस्लिमांना द्वेष भावनेतून समान नागरी कायदाची भाषा करत आहेत. दारू बंद करा सर्वांचे आर्थिक उत्पन्न एक करा. पण ते तुम्ही करत नाहीत. पण समान नागरी कायद लागू करण्याची भाषा बोलत आहात. अगोदर या सर्व गोष्टी करा मग समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात बोला, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी यांनी दिली.

मुंबईत आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलले; धक्कादायक माहिती उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here