सभेत बोलतांना राज ठाकरे यांनी एका प्रकारे धमकी दिली असून त्याची राज्य सरकारने दखल घ्यावी. शिवाय ४ तारखेला मशिदीसमोर भोंगे लावून वातावरण बिघडविणाऱ्या मनसे कार्यकर्त्यावर मोका लावण्याची मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ३ ऐवजी ४ मेची मुदत दिली आहे. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. मात्र, ४ मेपासून ऐकणार नाही. ज्या मशिदींवर भोंगे असतील, त्यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून दुप्पत आवाजात हनुमान चालीसा म्हणा’, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. सरळ भाषेत ‘त्यांना’ कळत नसेल तर एकदा होऊनच जाऊ द्या, असा आक्रमक सूरही त्यांनी लावला.