जळगाव : भडगाव तालुक्यातील देव्हारी या गावात घर खाली करायला सांगितले म्हणून भाडेकरूने ५३ वर्षीय घरमालकीन महिलेस विषारी औषध बळजबरीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रुग्णालयात दाखल महिलेच्या जबाबावरुन रविवारी ३ जणांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्का मारुन खाली पाडत कराटे नावाचे विषारी औषध बळजबरीने पाजले…

यासंदर्भात नीला अरुण देवरे (वय ५३, रा. श्रमिक नगर नाशिक ह.मु. देव्हारी कानाशी ता. भडगाव) यांनी दिलेल्या जबाबानुसार असे की, २९ एप्रिल २०२२ रोजी निला देवरे या अजबराव हिलाल पाटील यास सांगण्यासाठी गेले की, ‘तुम्ही आमचे घर खाली करुन द्या’. घर खाली करायला सांगितल्याचे वाईट वाटल्याने अजबराव पाटील व विकास बाबुराव पाटील हे दोघे निला देवरे यांच्याजवळ जवळ आले तर रोहिदास अजबराव पाटील याने निला देवरे यांना धक्का मारुन खाली पाडत त्याने कराटे नावाचे विषारी औषध बळजबरीने पाजले.

पुरंदरे आणि टिळकांचं गुणगान गाण्यासाठीच राज ठाकरेंनी सभा घेतली होती का, भुजबळांचा सवाल
पुढील तपास पोलीस करत आहेत…

एवढेच नव्हे तर दोघांनी निला देवरे यांचे पती अरुण देवरे यांना बांबुने मारहाण केली. विवाहितेला अस्वस्थ वाटत असल्याने त्या महिलेला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. जळगावातील जिल्हापेठ पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदविला. यावरुन संशयित अजबराव हिलाल पाटील, रोहिदास अजबराव पाटील आणि विकास बाबुराव पाटील (रा. देव्हारी कनाशी ता.भडगाव) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.

करोना लसीकरणासाठी सक्ती नको, सुप्रीम कोर्टाची सूचना , केंद्र आणि राज्यांना महत्त्वाचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here