पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे. खरंतर, मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीतर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण उद्या रमजान ईद (Ramadan Eid 2022) आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर (Raj Thackeray Aurangabad Sabha) स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.

मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण उद्या ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मसने कार्यकर्त्यांनी उद्या ऐवजी ४ तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्याच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही रस्त्यावरच होणार नमाज पठण, पोलिसांकडून वाहतूक वळवण्याचे आदेश
दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ३ ऐवजी ४ मेची मुदत दिली आहे. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. मात्र ४ मेपासून ऐकणार नाही. ज्या मशिदींवर भोंगे असतील, त्यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून दुप्पत आवाजात हनुमान चालीसा म्हणा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. सरळ भाषेत ‘त्यांना’ कळत नसेल तर एकदा होऊनच जाऊ द्या, असा आक्रमक सूरही त्यांनी लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here