बर्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narnendra Modi) यांचं जर्मनीत (Germany) उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. अनिवासी भारतीयांनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं होतं. यावेळी लहान मुलं देखील उपस्थित होती. नरेंद्र मोदींसमोर एका मुलानं गीत सादर केलं. तर, एका मुलीनं नरेंद्र मोदीचं रेखाचित्र काढलं होतं. नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी अनिवासी भारतीयांनी वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. नरेंद्र मोदी यांचा आजपासून तीन देशांचा दौरा सुरु झालेला आहे. या दौऱ्यात जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला मधील राष्ट्र प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.

व्लादिमीर पुतीन यांच्यावर कर्करोगावरील शस्त्रक्रिया होणार? देशाची सूत्र ‘या’ नेत्याकडे सोपवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीतील बर्लिनमध्ये पोहोचले तेव्हा अनिवासी भारतीय नागरिक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी काही लहान मुलं देखील मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होती.यावेळी उपस्थित असलेल्या एका मुलानं गीत म्हणण्यास सुरुवात केली. नरेंद्र मोदी यांनी त्याला ते गीत म्हणण्यास प्रोत्साहन आणि शाबासकी देखील दिली.

पाहा व्हिडीओ

नरेंद्र मोदी यांना यावेळी मान्या नावाची मुलगी देखील भेटली. मान्या हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रेखाचित्र रेखाटलं होतं. त्यावर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचं बोधचिन्ह आणि ‘डिअर प्राईम मिनिस्टर, वेलकम टू बर्लिन’ असे शब्द लिहिलं होतं. नरेंद्र मोदी यांनी मान्या हिनं रेखाटलेल्या चित्रावर स्वाक्षरी करुन तिला शाबासकी दिली. नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित असलेल्या लहान मुलांशी संवाद देखील साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसीय परराष्ट्र दौऱ्याची आजपासून सुरुवात झाली आहे. मोदी आज जर्मनीचे नवनिर्वाचित चॅन्सलर ओलाफ स्कोल्ज यांची भेट घेणार आहेत. भारत जर्मनी इंटर गर्वमेंटल कन्सलटेशनच्या सहाव्या फेरीची चर्चा मोदी आणि स्कोल्ज यांच्यामध्ये होणार आहे. नरेंद्र मोदी यानंतर डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देतील. तीन दिवसांच्या दौऱ्यात ते २५ कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. नरेंद्र मोदींचा या वर्षातील हा पहिला परराष्ट्र दौरा आहे.
‘डिअर प्राईम मिनिस्टर, वेलकम टू बर्लिन’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चिमुकलीकडून जर्मनीत अनोखं स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा जर्मनीपासून सुरु झाला आहे. यानंतर ते डेन्मार्कला भेट देतील. कोपेनहेगनमधील एका परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत. यानंतर ते फ्रान्सला भेट देतील. फ्रान्समध्ये ते इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here