मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती, असा उल्लेख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणात केला होता. मात्र, हा दावा अनेकांनी सपेशल नाकारला आहे. त्यामुळे नवा वाद सुरु झाला होता. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही उडी घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून राज ठाकरे यांचा दावा खोडून काढला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार १९२६ साली ब्रिटिशांनी शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होति पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली . पत्र व्यवस्थित वाचा, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता यावर राज ठाकरे किंवा मनसेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रायगडावरील छत्रपती शिवरायांची समाधी टिळकांनी बांधली: राज ठाकरे

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती. त्या लोकमान्य टिळकांकडे तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिळकांच्या पहिल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा होते. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता.
पुरंदरे आणि टिळकांचं गुणगान गाण्यासाठीच राज ठाकरेंनी सभा घेतली होती का, भुजबळांचा सवाल
छगन भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे यांचे भाषण ऐकल्यास असे वाटायला लागते की, ही सभा फक्त शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी आणि टिळक, बाबासाहेब पुरंदरे यांचे गुणगान गाण्यासाठी होती का? राज ठाकरे सांगतात तशी वस्तुस्थिती नाही. ३ एप्रिल १६८० ला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली तेव्हा लोकमान्य टिळक फक्त १३ वर्षांचे होते, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here