सांगली : औरंगाबाद येथे झालेल्या सभेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. उद्या जर काँग्रेस किंवा अन्य पक्षावर राज बोलले तर लोक राज याना फार महत्व देणार नाहीत. म्हणून ते फक्त शरद पवार यांच्यावर टीका करतात’, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. ‘तसेच राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत’, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे. ते सांगलीच्या ताकारी बोलत होते.

ईडीच्या दबावाखाली भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट राज ठाकरे वाचून दाखवतात…

मनसे नेते राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभे दरम्यान आपल्या भाषणातून शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेवरून जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाण साधला आहे. मंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘अजून भाजपा आणि मनसेची युती झालेली नाही आणि भाजपाने पण मनसेला अजून कुठलं स्थान दिले नाही. मात्र, केवळ ईडीच्या दबावाखाली भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट राज ठाकरे वाचून दाखवत आहेत’.

मोठी बातमी! राज ठाकरेंच्या सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीला स्थगिती
राज ठाकरे हे महागाईवर का बोलत नाहीत…

‘तसेच एकीकडे राज ठाकरेंनी हिंदूंच्या बद्दल बोलणं आणि दुसरीकडे ओवैसी मुस्लिमांच्या बद्दल बोलणं म्हणजे हे मतांचे धूर्वीकरणाचा डाव आहे. मात्र, आता दोन्ही समाजातील लोक हुशार झाले आहेत मतांच्या राजकारणासाठी सुरू असलेला डाव लोकाना कळत आहे. राज ठाकरे हे महागाईवर का बोलत नाहीत सगळे महागले आहे मुळ मुद्दा का विसरता, असा सवाल देखील जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना केला आहे.

राज ठाकरेंइतका खोटा नेता झाला नसेल, इतिहास सांगत श्रीमंत कोकाटेंचा घणाघात
राज ठाकरे यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली या विधानावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘महात्मा फुले यांनी केलेले काम दुर्लक्षित व्हावे अशा पध्दतीचे जातीयवाद त्यांच्याकडून होत आहेत असं वाटत नाही का’? असा सवाल ही उपस्थित केला.

Smartphone Blast: बॅगमध्ये असतांना Realme च्या स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट, कंपनी म्हणते चूक युझरची, पाहा डिटेल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here